नवीन होंडा अमेझ बाजारपेठेत दाखल

0

होंडा मोटर्स कंपनीने आपल्या अमेझ या मॉडेलची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारली असून आज याचे अधिकृत लाँचीग करण्यात आले आहे.

गेल्या महिन्याच्या प्रारंभी होंडा अमेझ-२०१८ या मॉडेलची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली होती. आज या मॉडेलला अधिकृतरित्या बाजारपेठेत सादर करण्यात आले. याच्या पेट्रोल व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य ५.५९ ते ७.५७ तर डिझेल व्हेरियंटचे मूल्य ६.६९ ते ८.६७ लाखांच्या दरम्यान आहे. हे मूल्य लाँचींगच्या पहिल्या टप्प्यातच देण्यात आले असून नंतर यात वाढ होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यात १.२ लीटर क्षमतेचे आय-व्हीटीईसी, ४-सिलेंडर पेट्रोल इंजिन असून याला ५ स्पीड मॅन्युअल गिअर्सला संलग्न करण्यात आले आहे. तसेच यात ७-स्टेप सीव्हीटी अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशनचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. तर यातील डिझेल इंजिन हे १.५ लीटर आय-डीटीईसी टर्बोचार्ज्ड या प्रकारातील असून यातही ५-स्पीड मॅन्युअल व ७-स्टेप सीव्हीटी अ‍ॅटोमॅटीक गिअर्सचे पर्याय आहेत. विशेष म्हणजे यातील डिझेल इंजिनाच्या व्हेरियंटमध्ये पहिल्यांदाच डिझेल सिव्हीटी (कंटिन्युअर व्हेरियेबल ट्रान्समीशन) या प्रकारची सुविधा देण्यात आली आहे.

नवीन होंडा अमेझमध्ये अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात नवीन ग्रील देण्यात आले आहे. याशिवाय यात नवीन बंपर, अद्ययावत हेड व टेललँप्स, डामंड कट अलॉय व्हील्स आदींचा समावेश आहे. याची डिझाईनदेखील थोड्या प्रमाणात बदलण्यात आली असून या मॉडेलला एयरोडायनॅमिक शेप प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय, यामध्ये ७ इंच आकारमानाची नवीन इन्फोटनमेंट प्रणाली देण्यात आली आहे. याला स्मार्टफोन कनेक्ट करण्याची सुविधा असेल. यात नेव्हिगेशनसह अन्य फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अ‍ॅटोमॅटीक एयरकंडीशनींग, क्रूझ कंट्रोल, कि-लेस इग्निशन, कॅमेरायुक्त रिअर पार्कींग सेन्सर, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अद्ययावत स्टीअरींग व्हील आदींचा समावेश आहे. मारूती सुझुकीची नवीन डिझायर, हुंदाई अ‍ॅक्सेंट, फोर्ड अस्पायर, टाटा टिगॉर आणि झेस्ट आदी मॉडेल्सला नवीन होंडा अमेझ तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here