नवीन पॅशन प्रो आणि पॅशन एक्सप्रोचे आगमन

0

हीरो मोटोकॉर्प कंपनीने आपल्या पॅशन प्रो आणि पॅशन एक्सप्रो या मॉडेल्सची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

नवीन पॅशन प्रो आणि नवीन पॅशन एक्सप्रो यांचे एक्स-शोरूम मूल्य अनुक्रमे ५३,४६० आणि ५४,४६०/- रुपये आहे. यातील नवीन पॅशन प्रो या मॉडेलमध्ये सोय, सुरक्षितता आणि सुलभ वापरासाठीची अनेकविध वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. तिच्या रचनेत या सर्व वैशिष्ट्यांचा बेमालूम मिलाफ झालेला असून परिणामी ही बाइक हाताळण्याच्या सुलभतेत सुधारणा झालीअसून ती कोणत्याही कटकटीविना बाइक चालविण्याचा अनुभव देते. या बाइकचे आधुनिक रूप आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी यांच्यामुळे ग्राहकांना अधिक चांगल्या अनुभवाची हमी मिळते. याच्या बोल्ड दर्शनी भागामध्ये फ्लश टाइप कॅप असलेला अधिक भरदार फ्युएल टँक आणि शैलीदार सिग्नेचर रिअर टेल लॅम्पसारख्या अनेक नव्या धर्तीची वैशिष्ट्ये बसविण्यात आली आहेत. याखेरीज या मोटरसायकलमध्ये डिजिटल फ्युएल गॉज असलेले डिजिटल- अ‍ॅनालॉग मीटर, ट्रीप मीटर, ऑल टाइम हेडलॅम्प ऑन आणि साइड स्टँड इंडिकेटर यांच्यासारख्या फिचर्सची भर टाकण्यात आली आहे. ही दुचाकी पाच बोल्ड मेटॅलिक रंगसंगतींचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही मोटरसायकल ड्रम आणि डिस्क अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

नवी पॅशन एक्सप्रो या मॉडेलमध्ये शैली, तंत्रज्ञान आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी यांचा नेमका संगम झाला आहे. तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून बनविण्यात आलेल्या या मोटारसायकलमध्ये कितीतरी आधुनिक आणि शैलीदार वैशिष्ट्यांची भर टाकण्यात आली आहे. यात फ्लश फ्युएल लिड असलेला नवा अधिक काटेकोर फ्युएल टँक, ड्युएल टोन असलेले आरसे, एलईडी टेल लॅम्प आणि डिजिटल फ्युएल गॉज असलेले डिजिटल- अ‍ॅनालॉग मीटर यांचा समावेश आहे. यातील ऑल टाइम हेडलॅम्प ऑन हे फिचरही देण्यात आले आहे. ही बाइक स्पोर्ट्स रेड, ब्लॅक मोनोटोन, सिल्व्हर मेटॅलिक, हेवी ग्रे मेटॅलिक तसेच फ्रॉस्ट ब्लू मेटॅलिक अशा पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही मोटरसायकल ड्रम आणि डिस्क ब्रेक अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here