नवीन आकर्षक रंगात मिळणार एलजी व्ही ३०

0

एलजी कंपनीने आपल्या एलजी व्ही३० या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची रासबेरी रोझ या नावाने गुलाबी रंगातील नवीन आवृत्ती ग्राहकांना उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

लास व्हेगास शहरात सुरू झालेल्या सीईएस-२०१८ या टेक प्रदर्शनात एलजी व्ही३० मॉडेलची गुलाबी रंगातील रासबेरी रोझ ही नवीन आवृत्ती लाँच करण्यात आली. या स्मार्टफोनमध्ये आधीनुसारच फिचर्स असतील. एलजी व्ही-३० या स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा १८:९ हे गुणोत्तर असणारा क्युएचडी (१४४० बाय २८८० पिक्सल्स) क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. याच्या मागील बाजूस १६ व १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असेल. याच्या मुख्य कॅमेर्‍यात सिने व्हिडीओ हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यात १६ विविध फिल्टर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, यात पॉइंट झूम हे फिचर असेल. यामुळेे व्हिडीओ चित्रीकरण करतांना स्क्रीनवरील कोणत्याही बिंदूपर्यंत झूम करता येणार आहे. तसेच यात क्रिस्टल क्लिअर या प्रकारातील लेन्स असेल. यामुळे एलजी व्ही ३० या मॉडेलमध्ये आयफोनच्या तोडीचा कॅमेरा असल्याचे दिसून येत आहे. मल्टीमिडीयाच्या चांगल्या अनुभुतीसाठी यात हाय-फाय क्वॉड डीएसी हे फिचर देण्यात आले आहे. तर डिजीटल मायक्रोफोनमुळे दर्जेदार ध्वनीमुद्रण करता येणार आहे. एलजी व्ही ३० मध्ये वायरलेस चार्जींगसह ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट आहे.

भारतात अद्याप याचे मूळ मॉडेल आलेले नसल्यामुळे याची नवीन आवृत्ती तशी थोडी उशीराच मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here