नवीन अमेझॉन किंडल ओअ‍ॅसिस : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

अमेझॉन कंपनीने आपल्या किंडल या ई-रीडरच्या किंडल ओअ‍ॅसिसची नवीन आवृत्ती लाँच केली असून यात आधीच्या मॉडेलपेक्षा अनेक सरस फिचर्सचा आहे.

अमेझॉनच्या पहिल्या किंडल ई-रीडरच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून अमेझॉनने किंडल ओअ‍ॅसिस या मॉडेलची नवीन आवृत्ती सादर केली आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. यामध्ये ऑडिबल तंत्रज्ञानाचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे अमेझॉनच्या ऑडिओबुकमधून कोणतेही पुस्तक खरेदी करून ते या ई-रीडरमध्ये ऐकणे शक्य आहे. अमेझॉनवर तब्बल ३.७५ लाख ऑडिओबुक्स आणि अन्य ऑडिओ कार्यक्रमांचा खजिना असून युजर याचा वापर नवीन अमेझॉन किंडल ओअ‍ॅसिसवर करता येणार आहे. हे नवीन मॉडेल आयपीएक्स८ सर्टीफाईड अर्थातच वॉटरप्रूफ असेल. विशेष बाब म्हणजे या मॉडेलच्या माध्यमातून अमेझॉनने पहिल्यांदाच वॉटरप्रूफ किंडल बाजारपेठेत उतारले आहे. अलीकडच्या कालखंडात बहुतांश उपकरणे वॉटरप्रूफ असल्यामुळे आता किंडलमध्येही ही सुविधा दिल्याचे मानले जात आहे.

नवीन किंडल ओअ‍ॅसिस या ई-रीडरमधील डिस्प्ले ७ इंच आकारमानाचा आणि ३०० पीपीआय क्षमतेचा आहे.याच्या प्रत्येक पानावर ३० टक्के जास्त शब्द मावत असल्याचे अमेझॉनने नमूद केले आहे. हे मॉडेल अतिशय स्लीम असून याचे वजन अवघे १९४ ग्रॅम आहे. यात ब्ल्यु-टुथ व वाय-फायसह सेल्युलर कनेक्टिव्हिटीदेखील प्रदान करण्यात आली आहे. यामुळे यात सीमकार्डचा वापरदेखील करता येणार आहे.

नवीन किंडल ओअ‍ॅसिसमध्ये ८ जीबी आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यामुळे यात हजारो ई-बुक्स, ऑडिओबुक्स, नियतकालिके आदींचा संग्रह करता येणार आहे. यात अक्षरांचा आकार (फाँट साईज) अ‍ॅडजस्ट करण्यासाठी पाच पर्यायांची सेटींग देण्यात आली आहे. तर डिस्प्लेवरही हव्या त्या पध्दतीने कस्टमायझेशनची सुविधा असेल. यात इनबिल्ट अँबिअंट लाईट दिलेला आहे. यामुळे भोवतालच्या प्रकाशानुसार याचा डिस्प्ले आपोआप अ‍ॅडजस्ट होतो. यात युजरने वाचलेले ई-बुक्स हे त्याच्या क्लाऊड अकाऊंटवर आपोआप अपलोड होत असतात. विशेष म्हणजे याच्या माध्यमातून कुणीही आपल्याला आवडलेल्या परिच्छदांना सोशल मीडियात शेअर करू शकतो. नवीन किंडल ओअ‍ॅसिसच्या ८ जीबी स्टोअरेज असणार्‍या मॉडेलचे मूल्य २४९ डॉलर्स, ३२ जीबीसाठी २७९ तर ३२ जीबी सेल्युलर मॉडेलचे मूल्य ३४९ डॉलर्स असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here