दोन व्हेरियंटमध्ये मिळणार ओप्पो रिअलमी १

0

ओप्पो कंपनीने आधी जाहीर केल्यानुसार आपल्या रिअलमी या नवीन ब्रँडच्या माध्यमातून रिअलमी १ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारला असून हे मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच ओप्पो कंपनीने आपण खास भारतात विकसित करण्यात आलेला अर्थात मेड इन इंडिया या प्रकारातील रिअलमी ब्रँड हा अमेझॉन इंडियाच्या सहकार्याने लाँच करणार असल्याचे जाहीर केले होते. यानुसार आज या ब्रँडच्याच माध्यमातून रिअलमी १ हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. ग्राहकांना हे मॉडेल अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

ओप्पो रिअलमी १ या स्मार्टफोनमध्ये ६.० इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टा-कोअर हेलिओ पी ६० हा प्रोसेसर दिलेला आहे. याचे ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोअरेज तसेच रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असे दोन व्हेरियंट सादर करण्यात आले आहेत. या दोन्हींमधील स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या माध्यातून वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यामध्ये फेस अनलॉक हे फिचरदेखील देण्यात आलेले आहे.

ओप्पो रिअलमी १ या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सल्स तर पुढे ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात पोर्ट्रेट मोड आणि बोके इफेक्टची सुविधा दिलेली आहे. याशिवाय, यामध्ये एआय ब्युटी, एआर स्टीकर, एआय सिन रिकग्नेशन आदी फिचर्सचाही समावेश आहे. यामध्ये ३,४१० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून यात ‘एआय बॅटरी मॅनेंजमेंट’ ही प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून बॅटरी दीर्घ काळापर्यंत टिकण्याची सुविधा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा कलर ओएस ५.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. ओप्पो रिअलमी १ या मॉडेलचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य ८,९९० तर ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य १३,९९० रूपया आहे. हे मॉडेल ग्राहकांना फक्त अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. याचा पहिला सेल २५ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here