दणदणीत फिचर्सयुक्त सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ मॉडेलची घोषणा

3
सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ ,samsung galaxy note 9

सॅमसंग कंपनीने गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून असणार्‍या गॅलेक्सी नोट ९ या मॉडेलची आज घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

सॅमसंग कंपनीने आधीच ९ ऑगस्ट रोजी ‘अनॅपक्ड २०१८’ या ग्लोबल लाँचींग कार्यक्रमाची माहिती दिली होती. या कार्यक्रमात नेमके कोणते मॉडेल लाँच होणार याची घोषणा करण्यात आलेली नव्हती. तथापि, विविध लीक्सच्या माध्यमातून हे मॉडेल सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ असेल अशी माहिती समोर आली होती. या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात याचे शानदार लाँचींग करण्यात आले.

गॅलेक्सी नोट ९ या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस म्हणजेच १४४० बाय २९६० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:५:९ असा आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा गतीमान प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके आहे. तर याचे दुसरे व्हेरियंट ८ जीबी रॅम आणि स्टोअरेज ५१२ जीबी असे असणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. हे कॅमेरे प्रत्येकी १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. यातील एक ड्युअल पिक्सल्स तर दुसरा टेलीफोटो लेन्स या प्रकारातील असणार आहे. यात २ एक्स इतका झूम देण्यात आलेला आहे. यात डीएसएलआर कॅमेर्‍यांप्रमाणे ‘बोके इफेक्ट’ देण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मदतीने ९६० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीने सुपर स्लो-मोशन या प्रकारच्या व्हिडीओच्या चित्रीकरणदेखील करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभर बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सॅमसंगच्या नोट या मालिकेतील आधीच्या मॉडेल्सनुसार यातही ‘एस पेन’ या स्टायलस पेनचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. या पेनच्या मदतीने स्मार्टफोनवर रेखाटन करणे वा नोटस् घेणे शक्य होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या मॉडेलसोबत देण्यात आलेला ‘एस पेन’ हा आधीपेक्षा अधिक अद्ययावत करण्यात आलेला आहे. यामध्ये ब्ल्युटुथ कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. याच्या मदतीने रेखाटनासह प्रतिमाही घेता येणार आहे. याच्या मदतीने व्हिडीओ प्ले अथवा पॉझ करणेदेखील शक्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे याच्या मदतीने पॉवर पॉइंट प्रेझेंटशन्सही सादर करता येणार आहे. अर्थात याची उपयुक्तता वाढविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा स्मार्टफोन ओशन ब्ल्यू, लव्हेंडर पर्पल, मिडनाईट ब्लॅक आणि मेटालिक कॉपर या आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यात ‘सॅमसंग डेक्स’ या प्रणालीची कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. यामुळे हा स्मार्टफोन अगदी सुलभपणे संगणकाच्या डिस्प्लेला जोडता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ९ हे मॉडेल लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिल्यांदा हे मॉडेल अमेरिकेत मिळणार आहे. येथे ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट ९९९ डॉलर्स म्हणजे सुमारे ६८,७०० रूपये इतके आहे. तर ८ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेल १२५० डॉलर्स अर्थात अंदाजे ८५,९०० रूपये इतके असेल.

अपडेट :- दरम्यान, आज १० ऑगस्ट रोजी सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी नोट ९ या मॉडेलचे भारतातील मूल्य जाहीर केले आहे. यात ६ जीबी रॅम व१२८ जीबी स्टोअरेज असणार्‍या मॉडेलचे मूल्य ६७,९०० रूपये ठेवण्यात आले असून ८ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेल ८४,९०० रूपयांना मिळणार आहे. १० ते २१ ऑगस्टच्या दरम्यान या मॉडेलची अगावू नोंदणी करण्यात येणार आहे. यानंतर हे मॉडेल प्रत्यक्षात ग्राहकांना मिळणार आहे. यासोबत कंपनीने नो-कॉस्ट इएमआयची सुविधा दिली आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डधारकांना ६ हजार रूपयांचा कॅशबॅक जाहीर करण्यात आलेला आहे. तर सॅमसंग शॉपमध्ये या मॉडेलसाठी एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे.

3 COMMENTS

    • पहिल्यांदा हे मॉडेल अमेरिकेत मिळणार आहे. येथे ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट ९९९ डॉलर्स म्हणजे सुमारे ६८,७०० रूपये इतके आहे. तर ८ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेल १२५० डॉलर्स अर्थात अंदाजे ८५,९०० रूपये इतके असेल. भारतातील मूल्य मात्री जाहीर करण्यात आलेले नाही.

    • अपडेट :-आज १० ऑगस्ट रोजी सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी नोट ९ या मॉडेलचे भारतातील मूल्य जाहीर केले आहे. यात ६ जीबी रॅम व१२८ जीबी स्टोअरेज असणार्‍या मॉडेलचे मूल्य ६७,९०० रूपये ठेवण्यात आले असून ८ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेल ८४,९०० रूपयांना मिळणार आहे. १० ते २१ ऑगस्टच्या दरम्यान या मॉडेलची अगावू नोंदणी करण्यात येणार आहे. यानंतर हे मॉडेल प्रत्यक्षात ग्राहकांना मिळणार आहे. यासोबत कंपनीने नो-कॉस्ट इएमआयची सुविधा दिली आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डधारकांना ६ हजार रूपयांचा कॅशबॅक जाहीर करण्यात आलेला आहे. तर सॅमसंग शॉपमध्ये या मॉडेलसाठी एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here