ड्युअल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त इन्फीनिक्स हॉट एस३एक्स

0
ड्युअल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त इन्फीनिक्स हॉट एस३एक्स

इन्फीनिक्सने ड्युअल रिअर कॅमेर्‍यांसह उत्तमोत्तम फिचर्सनी सज्ज असणारा इन्फीनिक्स हॉट एस३एक्स हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारला आहे.

इन्फीनिक्स हॉट एस३एक्स या मॉडेलचे मूल्य ९,९९९ रूपये असून याला आईस ब्ल्यू, स्टँडस्टोन ब्लॅक आणि ट्रेड विंड ग्रे या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे. फ्लिपकार्टचा दिवाली सेल १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून यातच या मॉडेलची विक्री सुरू होणार आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स असले तरी लक्षवेधी फिचर म्हणजे ड्युअल रिअर कॅमेर्‍यांचा सेटअप होय. या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ/२.० अपर्चरयुक्त १३ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येणार आहेत. यात एआय पोटेर्र्ट, एचडीआर, ब्युटी, प्रोफेशनल, नाईट, पॅनोरामा, टाईम लॅप्स आदी विविध मोडस्देखील देण्यात आलेले आहेत. तर सॉफ्ट एलईडी फ्लॅश आणि एफ/२.० अपर्चरयुक्त यातील फ्रंट कॅमेरा हा १६ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यात एआय बोके आणि एआय ब्युटी हे दोन विशेष फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ४-इन-१ पिक्सल्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. याच्या मदतीने ४ पिक्सल्स हे एका पिक्सलमध्ये मर्ज करण्यात येतात. परिणामी यातून अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, इन्फीनिक्स हॉट एस३एक्स या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा नॉचयुक्त डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी प्लस म्हणजे १५०० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३० हा प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ३ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here