डीटेलच्या स्मार्ट एलईडी टिव्हींची मालिका

0

डीटेल कंपनीने आता स्मार्ट एलईडी टिव्हींची मालिका भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

डीटेल या कंपनीने अलीकडच्या काळात अनेक अत्यल्प मूल्यातील फिचरफोन सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातच आता या कंपनीने स्मार्ट एलईडी टिव्हीचे उत्पादन सुरू केले असून बाजारपेठेत याला सादर केले आहे. या कंपनीने तीन स्मार्ट एलईडी टिव्ही सादर केले असून यातील दोन ३२ इंच तर एक २४ इंच आकारमानांचे आहेत. यांचे मूल्य अनुक्रमे १७,९९०; १३,९९० आणि ९,९९९ रूपये आहे. या सर्व मॉडेलमध्ये १३६६ बाय ७६८ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याची रॅम एक जीबी आणि स्टोअरेज ८ जीबी आहे. यात स्मार्टफोनवरील स्क्रिन हा टिव्हीवर दिसण्यासाठी ‘मीराकास्ट’ हे विशेष फिचर दिले आहे. यात युएसबी आणि वाय-फाय सपोर्ट देण्यात आलेला आहे. यावर गुगल प्ले स्टोअरवरील विविध अ‍ॅप वापरणे शक्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here