डिझायरची विशेष आवृत्ती बाजारपेठत सादर

0

मारूती सुझुकीने आपल्या डिझायर या मॉडेलची विशेष आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर केली असून पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये याला खरेदी करता येणार आहे.

मारूती सुझुकी कंपनीने गेल्या वर्षी डिझायरचे नवीन मॉडेल सादर केले होते. आता याचीच स्पेशल एडिशन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. हे मूळ मॉडेलच्या एलएक्सआय आणि एलडीआय या व्हेरियंटवर आधारित असणार आहे. यामध्ये पॉवर विंडोज, व्हील कव्हर आणि रिव्हर्स पार्कींग सेन्सर देण्यात आले आहे. तसेच यात मूळ व्हेरियंटपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये ब्ल्यु-टुथच्या सपोर्टने सज्ज असणारी ऑडिओ सिस्टीम, रिमोट सेंट्रल लॉकींग आदींचा समावेश असणार आहे. यात मूळ आवृत्तीमधील ड्युअल एयरबॅग्ज, अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीम, ब्रेक असिस्ट आदी फिचर्स देण्यात आले आहेत.

मारूती सुझुकी डिझायरच्या स्पेशल एडिशनमध्ये १.२ लीटरचे के या मालिकेतील पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. याच्या मदतीने ८२ हॉर्स पॉवर इतकी शक्ती आणि ११३ न्यूटनमिटर इतका अधिकतम टॉर्क निर्मित होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात ५ स्पीड मॅन्युअल आणि अ‍ॅटोमॅटीक या दोन्ही प्रकारातील गिअर्सचे पर्याय देण्यात आले आहेत. तर यातील डिझेल इंजिन हे १.३ लीटर क्षमतेचे आणि मल्टीजेट या प्रकारातील असून यातून ७४ एचपी शक्ती आणि अधिकतम १९० न्यूटन मिटर टॉर्क निर्मीत होतो. यातही ५-स्पीड मॅन्युअल आणि अ‍ॅटोमॅटीक हे गिअर्सचे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.

मारूती सुझुकी डिझायर स्पेशल एडिशनच्या पेट्रोल व्हेरियंटचे मूल्य ५.५६ लाखांपासून (दिल्लीतील एक्स-शोरूम मूल्य) तर डिझेल व्हेरियंटचे मूल्य ६.५६ लाखांपासून सुरू होणारे आहे. हे मॉडेल्स अल्प कालावधीसाठी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीच्या सर्व शोरूम्समधून याला खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here