डिजेआयचा ओस्मो मोबाईल स्टॅबिलायझर

0

डिजेआय कंपनीने ओस्मो मोबाईल स्टॅबिलायझरची नवीन आवृत्ती जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून ही आधीच्या मॉडेलची अद्ययावत आवृत्ती आहे.

ओस्मो मोबाईल स्टॅबिलायझर हे आधी २२९ डॉलर्स इतक्या मूल्यात लाँच करण्यात आले होते. सध्या याचे मूल्य २०० डॉलर्स आहे. मात्र याच्यापेक्षा खूप कमी म्हणजे अवघ्या १२९ डॉलर्समध्ये (सुमारे ८१६२ रूपये) ओस्मो मोबाईल स्टॅबिलायझरची नवीन आवृत्ती ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. अर्थात आधीच्या मॉडेलपेक्षा कमी मूल्य असले तरी यात अद्ययावत सुविधा आहेत. नावातच नमूद असल्यानुसार याचा उपयोग हा स्मार्टफोनला स्थिर करण्यासाठी करण्यात येणार आहे. अर्थात हे स्मार्टफोनचे गिंबल असेल. याच्या मदतीने अगदी कशाही प्रकार हलत्या अवस्थेत असणार्‍या स्मार्टफोनला स्थिर करून उत्तम दर्जाच्या प्रतिमा, सेल्फी प्रतिमा अथवा व्हिडीओ काढता येणार आहेत. आयफोनसह जगातील बहुतांश स्मार्टफोनशी याला सहजपणे संलग्न करता येणार आहे. यात बॅटरी ही इनबिल्ट अवस्थेतच देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १५ तासांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे मॉडेल उच्च दर्जाच्या नॉयलॉनपासून तयार करण्यात आले असून यामुळे आधीच्या मॉडेलपेक्षा हे वजनाने हलके आहे. अर्थात यामुळे ते सहजपणे वापरता येणार आहे. आधीच्या मॉडेलमध्ये पोर्ट्रेट मोडमध्ये व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे फिचर देण्यात आले नव्हते. मात्र यात ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

ओस्मो मोबाईल स्टॅबिलायझरची २३ जानेवारीपासून अगावू नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे डिजेआयतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here