डासांपासून मुक्ती देणार शार्पचे एयर प्युरिफायर

0

शार्प कंपनीने भारतात एफपी-एफएम४०ई हे एयर प्युरिफायर लाँच केले असून याची खासियत म्हणजे या मॉडेलमध्ये डास पकडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

अलीकडच्या काळात वायू शुध्दीकरण उपकरण अर्थात एयर प्युरिफायर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असून अनेक कंपन्यांनी याच्या उत्पादनात पदार्पण केले आहे. हवेतील घातक कणांना विलग करत शुध्द वायूचा पुरवठा करण्यासाठी हे उपकरण अतिशय उपयुक्त असे आहे. विशेष करून सध्याच्या प्रदूषित वातावरणात शुध्द हवेचा श्‍वास घेण्यासाठी एयर प्युरिफायर वापरले जात आहेत. यातच आता वायू शुध्दीकरणाच्या जोडीला अन्य फिचर्सदेखील दिले जात आहेत. या अनुषंगाने शार्प एफपी-एफएम४०ई हे एयर प्युरिफायर अनोखे असेच आहे. कारण यामध्ये मॉस्कीटो कॅचर अर्थात डास पकडण्याची यंत्रणा देण्यात आली आहे. यासाठी यात पाच स्टेप्सची प्रणाली वापरण्यात आली आहे. याच्या अंतर्गत अतीनील किरणांच्या मदतीने डासांना आकर्षीत करण्यात येते. यानंतर हवेच्या दबावाने त्यांना एका निर्वात पोकळीत ओढले जाऊन एका ठिकाणी चिपकवले जाते. याच्या मदतीने डासच नव्हे तर घरातील माशांनादेखील पकडणे शक्य असल्याचा दावा शार्प कंपनीने केला आहे. तर याच्या मदतीने हवेतील घातक कण, जिवाणू, विषाणू, जैविक कचरा, अपायकारक वायू/वाफ आदींना शोषून घेत शुध्द हवा पुरविली जाते. यामुळे हवेतून होणार्‍या अ‍ॅलर्जीस अटकाव करण्यात येत असल्याने दम्यासारख्या विकारांना प्रतिबंध घालता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. शार्प एफपी-एफएम४०ई हे एयर प्युरिफायर अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना २६,००० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here