डासांना पळविणारा स्मार्टफोन आता सवलतीच्या दरात

0

एलजी कंपनीने डासांना पळवून लावण्याची क्षमता असणारा एलजी के७आय हा स्मार्टफोन आता एक हजार रूपये कमी मूल्यात ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी एलजी के७आय हा स्मार्टफोन ७,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आला होता. आता हा स्मार्टफोन एक हजार रूपये कमी मूल्यात म्हणजेच ६,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन विविध शॉपींग पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहे. एलजी के७आय या मॉडेलमधील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे ङ्गमॉस्क्युटो अवेफ हे होय. अर्थात याच्या मदतीने मच्छर पळविता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यासाठी याच्या मागील बाजूस अल्ट्रासोनिक साऊंड निर्मितीची प्रणाली देण्यात आली आहे. या ध्वनीमुळे स्मार्टफोन असणार्या परिसरातून डास पळून जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या अल्ट्रासाऊंडचा स्मार्टफोनधारकाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचेही एलजी कंपनीने नमूद केले आहे.

एलजी के७आय या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा इन-सेल डिस्प्ले आहे. याची रॅम दोन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबींचे असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर यात २५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here