ट्विटर आणि ब्लूमबर्गचे ग्लोबल न्यूज नेटवर्क

0

ट्विटर या मायक्रो-ब्लॉगींग सर्व्हीसने ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या मदतीने टिकटॉक या नावाने ग्लोबल न्यूज नेटवर्क ही नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

ट्विटर कंपनीने युजर्सला आकर्षीत करण्यासाठी नवनवीन सुविधा देण्यास प्रारंभ केला आहे. अलीकडच्या कालखंडाचा विचार केला असता, ट्विटची शब्द मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. याच्या जोडीला मोमेंटस् हे फिचर जगभरातील युजर्सला उपलब्ध करण्यात आले असून एकाच विषयाशी संबंधीत सर्व ट्विट लागोपाठ वाचण्यासाठी ट्विट स्टॉर्मची सुविधाही देण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर ट्विटरने आता टिकटॉक हे वैश्‍विक पातळीवरील न्यूज नेटवर्क सुरू केले आहे. यासाठी ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेसोबत सहकार्याचा करार करण्यात आला आहे. नावातच नमूद असल्यानुसार यावरून विविध वर्गवारींमधील वृत्त युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे.

ग्लोबल न्यूज नेटवर्कवर ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेचे जगभरातील सुमारे २७०० पत्रकार क्षणाक्षणाला विविध घटनांचे अपडेटस् सादर करणार आहेत. याशिवाय ट्विटर वापरणार्‍या युजर्सकडून आलेले कंटेंटदेखील संपादीत करून यावर अपलोड केले जाणार आहे. या नेटवर्कवर लाईव्ह, व्हिडीओसह न्यूज अलर्ट आणि सविस्तर विवरणात्मक वृत्तांचा समावेश असेल. टिकटॉक हे स्वतंत्र संकेतस्थळ नसून ट्विटर हँडलच्या माध्यमातून याला कार्यान्वित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here