ट्विटरतर्फे युजर्सला पासवर्ड बदलण्याचे निर्देश

0
twitter

ट्विटरने आपल्या सर्व युजर्सला एका बगमुळे आपापल्या अकाऊंटचा पासवर्ड बदलण्याचे निर्देश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातील गोपनीयतेच्या मुद्यावरून वाद निर्माण झाले आहेत. यात कुविख्यात केंब्रीज अ‍ॅनालिटीका प्रकरणात फेसबुकच नव्हे तर ट्विटरवरूनही डाटा लीक झाल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडालेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता ट्विटरने आपल्या सर्व युजर्सला आपापल्या अकाऊंटचा पासवर्ड बदलण्याचे निर्देश दिले आहेत. ट्विटरला युजर्सच्या लॉगीनमध्ये एक बग आढळून आला आहे. यापासून बचाव करण्यासाठी पासवर्ड बदलण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ट्विटरतर्फे सांगण्यात आले आहे. युजर्सने घाबरून जाण्याची आवश्यकता नसून त्यांचा डाटा पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही ट्विटरने स्पष्ट केले आहे.

सध्या जगभरात ट्विटरचे सुमारे ३३ कोटी युजर्स असून या सर्वांना पासवर्ड बदलण्याचे निर्देश त्यांच्या टाईमलाईनवर दिसू लागले आहेत. यात ट्विटरच्या अकाऊंटसह ट्विटडीकसारख्या थर्ड पार्टीज अ‍ॅपचे पासवर्डदेखील बदलण्यात यावेत असे सूचित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here