ट्विटरचे अपडेट दाखल : जाणून घ्या बदल

0
twitter app, ट्विटर

ट्विटरने ताजे अपडेट सादर केले असून यात अँड्रॉइड युजर्सला खालील बाजूसदेखील नेव्हिगेशन बारचा वापर करता येणार आहे.

ट्विटर या मायक्रो-ब्लॉगींग साईटने अँड्रॉइड युजर्ससाठी नवीन अपडेट सादर केले आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे खालील बाजूला नेव्हीगेशन बार देण्यात आला आहे. हा बार वरील बाजूस असणाराच असेल. अर्थात यामध्ये होम, सर्च, नोटिफिकेशन्स आणि डायरेक्ट मॅसेज हा चार भाग दिलेले असती. अलीकडच्या काळात मोठ्या डिस्प्लेच्या स्मार्टफोनचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. यामुळे ट्विटरचा वापर करत असतांना पटकन वरील नेव्हिगेशन बारवर जाण्यामध्ये युजर्सला थोडी अडचण येत असते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ट्विटरने आपल्या युजर्सला खालील बाजूस याची सुविधा प्रदान केली आहे.

ट्विटरने आधीच आपल्या आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी ही सुविधा प्रदान केली आहे. अर्थात आयफोनधारक याचा आधीपासूनच वापर करत आहेत. आता अँड्रॉइड प्रणालीच्या वापरकर्त्यांनाही ही सुविधा मिळणार आहे. यासाठी युजरला ट्विटरचे अ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे. जगभरातील युजर्सला हे फिचर क्रमाक्रमाने वापरण्यास मिळणार आहे. यामुळे भारतातील युजर्सला या नवीन सुविधा मिळण्यासाठी थोडा विलंब लागण्याची शक्यता आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here