ट्रायचे दोन अ‍ॅप उमंगशी झालेत संलग्न

0

ट्रायने आपले आधी लाँच केलेले डीएनडी २.० आणि माय कॉल हे अ‍ॅप आता उमंग या ऑनलाईन मंचासोबत संलग्न करण्याची घोषणा केलेली आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने देशभरातील मोबाईल युजर्ससाठी काही अ‍ॅप्स लाँच केले आहेत. डीएनडी २.० आणि माय कॉल यांचा समावेश आहे. यातील डीएनडी २.० या अ‍ॅपच्या मदतीने युजर आपल्याला नको असणारे कॉल आणि एसएमएसपासून मुक्तता मिळवू शकतो. यामुळे विशेष करून टेलीमार्केटींग कंपन्यांच्या कटकटीपासून मुक्तता मिळण्यास मदत होते. तर माय कॉल या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर आपल्याला चांगल्या दर्जाची सेवा मिळत नसल्यास याची थेट तक्रार करून याचे निराकरण करू शकतो. ट्रायने गेल्या वर्षी हे दोन अ‍ॅप सादर केले असून यामुळे युजर्सची चांगली सुविधा झाली आहे. आता हेच दोन अ‍ॅप उमंग या ऑनलाईन मंचाशी संलग्न करण्यात येणार असल्याची माहिती ट्रायतर्फे देण्यात आली आहे.

उमंग म्हणजेच युनिफाईड मोबाईल अ‍ॅप्लीकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स होय. ही सेवा माहिती-तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक मंत्रालयाने विकसित केलेली आहे. ही सेवा अँड्रॉइड प्रणालीवर चालणारी आहे. यामध्ये सरकारच्या सर्व सेवांचा एकाच ठिकाणी लाभ घेता येणार आहे. यामुळे हे एकच अ‍ॅप विविध सेवांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. याचे देशभरात सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त डाऊनलोड करण्यात आलेले आहे. आता याच अ‍ॅपशी डीएनडी २.० आणि माय कॉल अ‍ॅप संलग्न करण्यात आलेले आहेत. म्हणजेच उमंग अ‍ॅपमध्ये हे दोन्ही अ‍ॅप्स आता इनबिल्ट अवस्थेत दिलेले आहेत. अर्थात डीएनडी २.० आणि माय कॉल हे अ‍ॅप स्वतंत्रपणेही उपलब्ध राहणार असल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here