टोयोटाचे कनेक्ट इंडिया अ‍ॅप

0

टोयोटा किर्लोस्कर मोटरने नुकतेच टोयोटा कनेक्ट इंडिया या अ‍ॅप्लिकेशनला लाँच केले असून याच्या मदतीने ग्राहकांना सर्व सेवा-सुविधा आपल्या स्मार्टफोनवर उपलब्ध झाल्या आहेत.

टोयोटाच्या ग्राहकांना हे अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालींसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. हा पूर्णत: अत्याधुनिक क्लाऊड आधारीत सेवा मंच आहे. ज्याला महत्त्वाकांक्षी आणि विशेष कॉल सेंटर, टोयोटा विक्रेत्यांचे संपर्क जाळे आणि सेवा पुरवठादारांची एकाच ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. हे अ‍ॅप २४ बाय ७ कॉल सेंटरद्वारे सहाय्य करण्यात आलेल्या नेव्हिगेशनची एक अनोखी सेवा देते. ज्यामुळे वापरकर्त्यांना अतिशय सहजतेने गंतव्यस्थळावर नेव्हिगेट करण्यास मदत मिळते. एक सोयीस्कर आणि आकर्षक प्रवास अनुभव देण्याच्या हेतूने, ३-डी ऑफलाइन नकाशे, लेन मार्गदर्शन, गती मर्यादा, जंक्शन आणि रस्त्यांना फुटणार्‍या फाट्यांचा एनलार्ज व्ह्यू आणि ‘रिअल टाईम’ ट्रॅफिक अपडेटसह दिशादर्शनाचे काम करतेे. याशिवाय यात टोयोटाच्या वाहनांसाठी सर्विस रिमाइंडर, ऑनलाईन सेवा अपॉइंटमेंट, लाईव्ह सर्विस स्टेटस आणि ई-पेमेंटच्या सुलभ सेवा समाविष्ट आहेत.

सर्व नव्या सेवांबद्दल बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अकितोशी ताकेमुरा म्हणाले की, “टोयोटा कनेक्ट इंडिया ग्राहक प्राधान्य सूत्रावर चालते. जे सुलभ, शांत आणि आनंदी ड्राईविंग अनुभवाची हमी देते. प्रगत देशांमध्ये ज्याप्रमाणे दिशादर्शक साहाय्य ऑपरेटर पुरवतात तशी सेवा उपलब्ध करून देणारे आम्ही पहिले वाहन निर्मितीदार आहोत.” तर टोयोटा किर्लोस्कर मोटरचे डायरेक्टर आणि सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, सेल्स अँड मार्केटींग, एन राजा म्हणाले की, “हा मंच अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे. त्यात वापरण्यात आलेल्या अ‍ॅप्लिकेशन ग्राहकांना जागतिक दर्जाची गुप्तता आणि माहिती सुरक्षा पुरवतील. आज डिजीटल जगाचा वेग वाढला आहे, त्यामुळे आम्ही तंत्रज्ञानावर आधारीत बदल आणि कल्पकता राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here