टेलिग्राम मॅसेंजरवर ऑटो नाईट मोड

0
telegram

टेलिग्राम मॅसेंजरचे ताजे अपडेट सादर करण्यात आले असून यावर ऑटो नाईट मोडसह अन्य फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

टेलिग्राम मॅसेंजरची अँड्रॉइड प्रणालीसाठीची ४.८ ही ताजी आवृत्ती नुकतीच सादर करण्यात आली आहे. यात ऑटो नाईट मोड हे अभिनव फिचर देण्यात आले आहे. कुणीही युजर सेटींग-थीम-ऑटो नाईट मोड या मार्गाने जाऊन ही सेटींग ऑन करू शकतो. याशिवाय यात डार्क मोडसाठी नेमकी कोणती थीम असावी? याला निवडण्याचे पर्यायदेखील देण्यात आले आहेत. एकदा का ही सेटींग केली की मग रात्रीच्या वेळेस टेलिग्राम मॅसेंजर हे डार्क मोडमध्ये उघडेल. याशिवाय टेलिग्राम मॅसेंजरच्या ताज्या अपडेटमध्ये व्हिडीओ स्ट्रीमिंगची सुविधादेखील देण्यात आली आहे. म्हणजेच कोणताही व्हिडीओ हा पूर्णपणे उघडला नसला तरीही तो युजरला पाहता येणार आहे. तसेच टेलिग्राम अकाऊंटच्या मदतीने विविध संकेतस्थळांवर लॉगीन करण्याची सुविधादेखील या अपडेटच्या माध्यमातून प्रदान करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र विजेटदेखील सादर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here