टॅबलेट विक्रीत लेनोव्होचा दबदबा

0

लेनोव्हो कंपनीने भारतीय बाजारपेठेत अँड्रॉइड प्रणालीवर चालणार्‍या टॅबलेट विक्रीत घेतलेली आघाडी कायम ठेवत पहिला क्रमांक मिळवला असल्याचे ताज्या आकडेवारीतून अधोरेखित झाले आहे.

इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन म्हणजेच ‘आयडीसी’ या संस्थेने गत वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेत विक्री झालेल्या टॅबलेट मॉडेल्सवरून एक अहवाल सादर केला आहे. यात लागोपाठ तिसर्‍या तिमाहीत लेनोव्हो कंपनीने आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. लेनोव्होने तब्बल ३०.८ टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. तर एसर, सॅमसंग आणि आयबॉल या कंपन्यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला आहे. तर आपल्या अत्यंत किफायतशील मॉडेल्ससाठी ख्यात असणारी डाटाविंड कंपनी पाचव्या क्रमांकावर असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here