जेव्हीसीचे ट्रॉली स्पीकर्स भारतीय बाजारपेठेत दाखल

0

जेव्हीसी कंपनीने आपले एक्सएस-एमसी१५ हे ट्रॉली स्पीकर्स भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहेत.

सध्या पोर्टेबल ऑडिओ सिस्टीमची लोकप्रियता वाढू लागली आहे. कुठेही नेण्यास सक्षम असणारे आटोपशीर आकाराचे स्पीकर लोकप्रिय होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आता जेव्हीसी कंपनीने एक्सएस-एमसी१५ या नावाने नवीन ट्रॉली स्पीकर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. याचे मूल्य २४,९९९ रूपये असून हे मॉडेल बहुतांश शॉपींग पोर्टल्ससह देशभरातील शॉपीजमधून मिळणार आहे. अर्थात याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार या ध्वनी प्रणालीच्या खालील बाजूस ट्रॉलीप्रमाणे चाके लावण्यात आलेली आहेत. यामुळे हे स्पीकर्स कुठेही अगदी सहजपणे नेता येणार आहेत. अर्थात हे खर्‍या अर्थाने पोर्टेबल आहेत.

जेव्हीसी एक्सएस-एमसी१५ या मॉडेलमध्ये अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे पाच तासांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. यात इनबिल्ट एफएम रेडिओदेखील देण्यात आलेला आहे. यामध्ये ब्ल्यु-टुथ, मायक्रो-एसडी आणि युएसबी आदी कनेक्टीव्हिटीचे पर्याय देण्यात आलेले आहेत. या स्पीकर्सची क्षमता २००० वॅट इतकी आहे. यात दोन मायक्रोफोन इनपुटची व्यवस्था दिलेली आहे. यात नॉइस कॅन्सलेशन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here