जिओनी ए१ प्लसच्या मूल्यात घसघशीत कपात

0

जिओनी कंपनीने आपल्या जिओनी ए १ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल सहा हजार रूपयांची घट केली आहे.

गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात जिओनी ए१ प्लस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत २६,९९९ रूपये किंमतीत सादर करण्यात आला होता. डिसेंबरच्या अखेरीस याचे मूल्य तीन हजार रूपयांनी कमी केल्यामुळे २३,९९९ रूपये इतके होते. तर यात आता सहा हजारांची कपात करण्यात आली असून हा स्मार्टफोन ग्राहकांना १७,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. जिओनी ए१ प्लस या मॉडेलमध्ये सहा इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा २.५ डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ हे संरक्षक आवरण असेल. ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी२५ या वेगवान प्रोसेसरने सज्ज असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारा असून यावर जिओनी कंपनीचा अमिगो ४.० हा युजर इंटरफेस असेल. याची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे.

यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या मागच्या बाजूला एफ/२.० अपार्चरसह १३ मेगापिक्सल्स आणि ५ मेगापिक्सल्स असे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २० मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. जिओनी ए १ प्लस या मॉडेलमध्ये ४५५० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here