जाणून घ्या बोके इफेक्ट आहे तरी काय ?

0

सध्या बहुतेक स्मार्टफोन्सच्या कॅमेर्‍यांमध्ये बोके इफेक्टची सुविधा दिलेली असते. हा इफेक्ट नेमका कसा काम करतो? याची सुलभ माहिती विवो कंपनीने एका व्हिडीओतून दिली आहे.

जगभरातील युजर्समध्ये बोके इफेक्ट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला आहे. यात कोणत्याही प्रतिमेमधील हवा तो भाग स्पष्टपणे दिसत असून अन्य भाग हा धुसर (ब्लर) करण्यात आलेला असतो. यामुळे त्या प्रतिमेतील एखादा घटक हा चांगलाच उठून दिसतो. हा इफेक्ट अतिशय मनमोहक असल्यामुळे याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत विवो कंपनीने एका जाहिरातीच्या माध्यमातून बोके इफेक्टला अतिशय सोप्या पध्दतीने समजावून सांगितले आहे.

विवो कंपनीने अलीकडेच सुपरस्टार आमीर खान याला आपला ब्रँड अँबेसेडेर म्हणून नियुक्त केले आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या विवो व्ही ९ या मॉडेलच्या जाहिरातीतही आमीरच दिसत आहे. या पार्श्‍वभूमिवर, विवोच्या बोके इफेक्टबाबत असणार्‍या व्हिडीओतही आमीर आहे. यात त्याने अतिशय सुलभ पध्दतीने बोके इफेक्ट समजावून सांगितला आहे. यामध्ये आमिरच्या घरात मांजर आणि कुत्र्याचे भांडण सुरू असतांना तो त्यांच्या समोर दोन मेणबत्त्या ठेवत विवो स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यातून फोटो काढतो. आणि अर्थातच कुत्रा आणि मांजरीला ब्लर करून मेणबत्त्यांना ठळकपणे आपल्या फोटोमध्ये दाखवितो. या माध्यमातून त्याने अतिशय सुलभ रितीने बोके इफेक्ट समजावून सांगितला आहे.

आपणही पहा हा व्हिडीओ :-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here