जाणून घ्या पेटीएम अ‍ॅपमधील नवीन फिचर

0

पेटीएम या देशातील सर्वात मोठ्या डिजीटल पेमेंट प्रणालीने आपल्या अ‍ॅपवर नवीन फिचर प्रदान केले असून याची आपण माहिती करून घेऊया.

पेटीएम कंपनीने जाणीवपूर्वक आपल्या युजर्सला नवनवीन सुविधा देण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने आता कुणीही पेटीएम अ‍ॅपला आपले बँक खाते जोडून याच्या माध्यमातून बँक-टू-बँक या प्रकारात पैशांची देवाण-घेवाण करू शकणार आहेत. यासाठी माय पेमेंट हे नवीन फिचर देण्यात आले आहे. याच्या माध्यमातून युजर कोणत्याही बँकेच्या अकाऊंटमध्ये पैशांची ट्रान्सफर करू शकतो. विशेष बाब म्हणजे यासाठी कोणत्याही अतिरिक्त पैशांची आकारणी करण्यात येणार नाही. अर्थात यासाठी झीरो चार्ज लागणार आहे. अगदी नॉन-केवायसी पेटीएम ग्राहकदेखील या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे. याच्या माध्यमातून रिकरींग (आवर्ती) तसेच मोठ्या रकमांचे व्यवहार अगदी सुलभ पध्दतीने करता येतील.

पेटीएम अ‍ॅपवरील माय पेमेंट या फिचरच्या माध्यमातून २०१८ च्या अखेरपर्यंत सुमारे ६०,००० कोटी रूपयांचे व्यवहार होणार असल्याची अपेक्षा या कंपनीने व्यक्त केली आहे. तर देशात डिजीटल व्यवहारांना गती देण्यासाठी पेटीएम कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये तब्बल ५,००० कोटी गुंतवणूक करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here