जगातील पहिला ‘अँटी स्मार्ट’ मोबाईल फोन !

0

येर्‍हा.कॉम या ई-कॉमर्स पोर्टलने भारतीय ग्राहकांसाठी एलरी नॅनोफोन सी हा जगातील सर्वात लहान हँडसेट लाँच केला असून हा ‘अँटी स्मार्ट’ मोबाईल फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एलरी नॅनोफोन सी याचा आकार एखाद्या क्रेडिट कार्डपेक्षा लहान आहे. हे मॉडेल भारतीय ग्राहकांना ब्लॅक, रोझगोल्ड आणि सिल्व्हर या तीन आकर्षंक रंगांमध्ये ३९४० रूपये मुल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. याचे वजन अवघे ३० ग्रॅम असून लांबी ९४.४ मिमी रूंदी तर ७.६ मिमी जाडी असे आकारमान आहे. यात एक इंच आकारमानाचा रंगीत टिएफटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात एमपी-थ्री प्लेअर, अलार्म आणि व्हाईस रेकॉर्डर आदी फिचर्स आहेत. या मॉडेलमध्ये एक खास इनबिल्ट फिचर असून यामुळे ब्ल्यु-टुथच्या मदतीने कोणताही स्मार्टफोन याच्याशी संलग्न होऊ शकतो. अर्थात त्यावरून कॉल करणे वा रिसीव्ह करणे शक्य होते. अर्थात या स्मार्टफोनवरून कॉलसह संदेशांची देवाण-घेवाण करणे शक्य आहे.

एलरी नॅनोफोन सी या मोबाईल म्हणजे केवळ आकारानेच लहान नसून तो जगातील पहिला ‘अँटी स्मार्ट’ मोबाईल फोन असल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थात यात संदेशाचे आदान-प्रदान करण्याची सुविधा असली तरी इंटरनेटची सुविधा नाहीय. अर्थात फेसबुक, व्हाटसअ‍ॅपसारख्या सोशल साईट आणि मॅसेंजरपासून युजरला दुर राहण्यासाठी हा मोबाईल उपयुक्त असल्याने स्मार्टफोनचे व्यसन दूर करण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचा दावा येर्‍हा.कॉम या कंपनीने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here