चार कॅमेर्‍यांनी युक्त लेनोव्हो के ९ दाखल

0
लेनोव्हो के ९, lenovo k9

लेनोव्हो कंपनीने चार कॅमेर्‍यांनी युक्त असणारा लेनोव्हो के ९ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

लेनोव्हो कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रदीर्घ काळानंतर ए ५ आणि के ९ हे दोन मॉडेल्स लाँच केले आहेत. या कंपनीने आधीचा लौकीक जपत पुन्हा एकदा किफायतशीर मूल्याच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे यातून दिसून आले आहे. लेनोव्हो के ९ या मॉडेलची खासियत म्हणजे याच्या पुढील आणि मागील बाजूंना ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. अर्थात यात चार कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे दिलेले आहेत. तर पुढील बाजूसही याच क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील डिस्प्ले हा ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यामध्ये मीडियाटेकचा ऑक्टा-कोअर हेलीओ पी२२ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. हे मॉडेल ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना ८,९९९ रूपये मूल्यात फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here