चक्क ४०० मेगापिक्सल्सचा कॅमेरा !

0

हॅसलब्लाड कंपनीने ४०० मेगापिक्सल्स क्षमता असणारा कॅमेरा जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

हॅसलब्लाडने एच६डी-४०० सी एमएस या मॉडेलमध्ये अलीकडच्या काळात वापरण्यात येणारे मल्टी शॉट तंत्रज्ञान दिलेले आहे. या कॅमेर्‍यातही प्रत्येकी १०० मेगापिक्सल्स क्षमतांच्या सहा लेअरच्या प्रतिमांना एकत्र जोडून एकच ४०० मेगापिक्सल्सची प्रतिमा घेता येते.

हॅसलब्लाड एच६डी-४०० सी एमएस या कॅमेर्‍यात स्मार्टफोनप्रमाणे अतिशय सुलभ असा इंटरफेस देण्यात आला आहे. यात टचस्क्रीन डिस्प्लेच्या माध्यमातून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येते. कनेक्टीव्हिटीसाठी यात वाय-फाय, एचडीएमआय आणि युएसबी ३.० आदी पर्याय देण्यात आले आहेत. तर याच्या मदतीने एचडी आणि युएचडी क्षमतांचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील करता येते. हॅसलब्लाड एच६डी-४०० सी एमएस कॅमेर्‍याचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ४७,९९५ डॉलर्स (सुमारे ३०,६३,५४४ रूपये) इतके आहे. अर्थात इतके उच्च मूल्य प्रो लेव्हलवरील छायाचित्रकारांनाच परवडणारे आहे. ही बाब लक्षात घेत हॅसलब्लाड कंपनीने याला भाडे तत्वावर देण्याची घोषणादेखील केली असून निवडक देशांमध्ये याला लागू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here