गेमिंगसाठी फेसबुकचे स्वतंत्र पोर्टल

0

फेसबुकने खास गेमर्ससाठी स्वतंत्र पोर्टल जाहीर केले असून यावर युजरला विविध गेम्सच्या लाईव्ह तसेच रेकॉर्डेड स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे.

फेसबुकने आपल्या युजर्सचा वापर वाढण्यासाठी नवनवीन युक्त्यांचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. अलीकडेच युजर्सला डेटींगसाठी खास फिचर देण्यात आले होते. आता गेमर्ससाठी स्वतंत्र विभाग देण्यात आला आहे. कुणीही गेमर FB.GG या युआरएलवर जाऊन याला वापरू शकणार आहे. यात संबंधीत युजर गेम खेळत असल्यास याला ब्रॉडकास्ट करू शकणार आहे. यासोबत तो त्याला हवा असणारा गेम, गेमर, ग्रुप आदींना फॉलो करू शकणार आहे. या सर्वांच्या गेम्सचे स्ट्रीमिंग त्याला पाहता येणार आहे. वर नमूद केल्यानुसार ते लाईव्ह आणि रेकॉर्डेड या दोन्ही प्रकारांमध्ये असणार आहे. हे एक प्रकारचे गेमिंग अ‍ॅग्रिगेटरचे काम करणार आहे. यावर विविध गेम्स उपलब्ध राहणार आहेत. तर फेसबुक लवकरच ई-स्पोर्टसच्या स्पर्धादेखील घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या माध्यमातून आपल्या युजर्सची ‘एंगेजमेंट’ वाढविण्याचा फेसबुकचा प्रयत्न आहे. यासोबत अमेझॉनचे ट्विच आणि गुगलच्या युट्युब गेमिंगला तगडे आव्हान उभे करण्याचा प्रयत्नदेखील यातून करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच फेसबुकचा विशेष करून टिनएजर्समधील युजर बेस कमी होत असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्‍वभूमिवर संबंधीत वयोगटाला आकर्षीत करण्यासाठी गेमिंग पोर्टलची सुविधा देण्यात आल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here