गुगल होम स्मार्ट स्पीकरवर आता हिंदीचा सपोर्ट

0
google home,google home mini
गुगल होम व होम मिनी

गुगल होम या स्मार्ट स्पीकरवर आता हिंदीचा सपोर्ट देण्यात आला असून यामुळे युजर यावर हिंदीतून व्हाईस कमांड देऊ शकणार आहे.

गुगल होम स्मार्ट स्पीकरमध्ये गुगल असिस्टंट हा इनबिल्ट अवस्थेत दिलेला आहे. याच्याच माध्यमातून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन केले जाते. वास्तविक पाहता स्मार्टफोनमधील गुगल असिस्टंटमध्ये आधीच हिंदी भाषेचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. तथापि, आजवर होम हा स्मार्ट स्पीकरमध्ये ही सुविधा नव्हती. या अनुषंगाने आता गुगलने ही सुविधादेखील प्रदान केली असून याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे आता कुणीही आपल्या घरातील गुगलच्या या स्मार्ट स्पीकरसोबत हिंदीतून बोलू शकणार आहे. ही सुविधा गुगल होम आणि होम मिनी या दोन्ही स्मार्ट स्पीकरमध्ये देण्यात आलेली आहे.

गुगल होम आणि गुगल होम मिनी हे दोन्ही स्मार्ट स्पीकर व्हाईस कमांडवर कार्यान्वित करता येतात. कुणीही युजर ओके गुगल अथवा हे गुगल या शब्दांनी याला आज्ञा देऊ शकतो. याच्या मदतीने कुणीही घरातील स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करून याच्या विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. यात अतिशय संवेदनशील मायक्रोफोन देण्यात आले आहेत. ते व्हाईस कमांड ऐकण्यासाठी २४ तास सज्ज असतात. याच्या मदतीने कॉल करणे वा रिसिव्ह करणे, संगीत ऐकणे, बातम्या ऐकणे, हवामानाचे अलर्ट वा ट्रॅफीकची माहिती आदी बाबीदेखील जाणून घेता येतात. गुगल होम हा ६ इंच बाय ४ इंच आकारमानाचा लंबगोलाकार स्पीकर आहे. तर गुगल होम मिनीचे आकारमान हे यापेक्षा अतिशय आटोपशीर असेच आहे. याच्या वरील भागात एलईडी देण्यात आलेले आहेत. तर याच्या टच पॅनेलवर हा स्पीकर नियंत्रीत करण्यासाठी विविध बटन्स देण्यात आले आहेत. यावरून कॉल करणे वा रिसिव्ह करणे, ध्वनी कमी वा जास्त करणे तसेच म्युझिक ट्रॅक बदलणे आदी फंक्शन्सची सुविधा देण्यात आली आहे. याला गुगल क्रोमकास्टचा सपोर्ट असल्याने यावर स्ट्रीमिंगचा आनंद घेता येतो. तर यामध्ये क्रोमकास्ट हे इनबिल्ट अवस्थेत असणार्या उपकरणांना ते कनेक्ट करता येेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here