गुगल सर्चमध्ये दिसणार ‘स्टोरीज’

0

गुगल सर्चमध्ये आता स्टोरीज हे फिचर दिसणार असून निवडक डेव्हलपर्ससाठी याला पहिल्या टप्प्यात प्रदान करण्यात आले आहे.

आपण जर स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम वापरत असाल तर आपल्याला ‘स्टोरीज’ हे फिचर माहित असेल. याला फेसबुक आणि व्हाटसअ‍ॅपवरही वापरता येते. नेमके याच नावाचे पण थोड्या बदललेल्या स्वरूपात आता गुगल सर्चवर हे फिचर दिसणार आहे. गुगलने आता आपल्या एएमपी म्हणजेच ‘अ‍ॅक्सेलरेटेड मोबाईल पेजेस’ या सुविधेचा वापर करणार्‍या काही प्रकाशकांना स्टोरीजची सुविधा दिली आहे. याच्या अंतर्गत आपण गुगलवरून संबंधीत पोर्टलला (उदा. सीएनएन) सर्च केले असता आपल्याला पहिल्या सर्च रिझल्टच्या खाली त्या प्रकाशकाने प्रसिध्द केलेले ताजे रिझल्ट हे उभ्या कार्डच्या स्वरूपात दिसतात. सध्या मोजक्या संकेतस्थळांना ही सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र लवकरच ‘एएमपी’ची सुविधा वापरण्यांनाही गुगल सर्चमध्ये याचा वापर करता येणार आहे. यात शब्द, प्रतिमा आणि अ‍ॅनिमेशनचा एकत्रीत वापर करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here