गुगल वन क्लाऊड सेवेची घोषणा

0
गुगल वन, google 1

गुगल वन या नवीन क्लाऊड सेवेची घोषणा करण्यात आली असून याच्या अंतर्गत ग्राहकांना अत्यंत किफायतशीर मूल्यात स्टोअरेजचे प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत.

गुगल कंपनीने आपल्या जी-सुट या पॅकेजच्या अंतर्गत गुगल ड्राईव्ह या सेवेच्या माध्यमातून कधीपासूनच क्लाऊड स्टोअरेजची सुविधा केलेली आहे. याच्या अंतर्गत युजरला १५ जीबी स्टोअरेज मोफत देण्यात येत असून यावर १०० जीबीपासून विविध स्टोअरेजचे प्रिमीयम प्लॅन्स सादर केले आहेत. याला जगात अतिशय उत्तम प्रतिसाददेखील लाभला आहे. आता मात्र गुगलने गुगल वन या नावाने नवीन क्लाऊड स्टोअरेज सेवा सुरू केली आहे. यात गुगल ड्राईव्हच्या तुलनेत थोड्या किफायतशीर मूल्यातले प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत. याशिवाय यात फॅमिली शेअरिंगची सुविधादेखील देण्यात आली आहे. यामुळे एकाच अकाउंटवरून कोणत्याही युजरला त्याच्या फॅमिलीतील अन्य सदस्यांनाही ही स्टोअरेज सेवा वापरता येणार आहे. तसेच याच्या युजर्सला गुगल कंपनीच्या एक्सपर्टकडून तात्काळ शंका निरसन करण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

गुगल वन या सेवेसाठीचे दरदेखील जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गुगल ड्राईव्हप्रमाणेच १५ जीबी स्टोअरेज मोफत देण्यात येणार आहे. तर १०० जीबी स्टोअरेजसाठी प्रति-महिना १.९९ डॉलर्सची आकारणी करण्यात येणार आहे. १ टेराबाईटसाठी हाच दर ९.९९ डॉलस; १० टेराबाईटसाठी ९९.९९ डॉलर्स; २० टेराबाईटसाठी १९९.९९ डॉलर्स तर ३० टेराबाईटसाठी २९९.९९ डॉलर्स इतका असेल असे जाहीर करण्यात आले आहे. याचा अर्थातच वैयक्तीक पातळीपासून ते कार्पोरेट क्षेत्रापर्यंत उपयोग होणार आहे. गुगल वन या सेवेसाठ सध्या तरी साईन-अप करण्याची सुविधा दिलेली नाही. गुगल ड्राईव्हचे सर्व युजर्स येत्या कालखंडात आपोआप गुगल वन या सेवेत परिवर्तीत होणार आहे. याचा प्रारंभ अमेरिकेपासून होणार असून भारतासह अन्य देशांमधील युजर्सलाही हे अपडेट मिळणार आहे. अर्थात आता गुगल ड्राईव्हची जागा गुगल वन घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here