गुगल मॅप्स आता जिओफोनवरही वापरता येणार

0
जिओफोनवर,जिओफोन, jiophone

जिओफोनवर आता गुगल मॅप्स वापरण्याची सुविधा मिळणार असून ग्राहकांना याचे अपडेट लवकरच सादर करण्यात येणार आहे.

रिलायन्सने अलीकडेच आपल्या जिओफोनवर व्हाटसअ‍ॅप, फेसबुक आणि युट्युब हे अ‍ॅप वापरण्याची सुविधा ग्राहकांना देण्याची घोषणा केली आहे. यातच आता युजर्सला गुगल मॅप्सचाही वापर करता येणार आहे. जगभरात गुगल मॅप्स हे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. याचे तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. याचा नेव्हिगेशनसाठी मोठ्या प्रमाणात वापर करता येतो. तथापि, आजवर जिओफोनवर याच्या वापराची सुविधा नसल्यामुळे युजर्सची कुचंबणा होत होती. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आता जिओफोनच्या युजर्सलाही याचा वापर करता येणार आहे.

जिओफोनवर असलेल्या जिओ स्टोअरमधून गुगल मॅप्स आता युजरला आपल्या मॉडेलवर इन्स्टॉल करता येणार आहे. अर्थात यासाठी कायओएस या ऑपरेटींग सिस्टीमचे ताजे अपडेट वापरणार्‍या युजरलाच ही सुविधा मिळणार आहे. या अपडेटच्या माध्यमातून कुणीही युजर गुगल मॅप्सवर आपल्याला हवे ते ठिकाण शोधू शकणार आहे. यावर तो ट्रॅफीकची माहिती मिळवू शकतो. तसेच एखाद्या ठिकाणी जाण्यासाठीचा मार्ग शोधू शकतो. तथापि, यात रिअल-टाईम या प्रकारातील वाहतुकीची स्थिती तसेच ३६० अंशातील पॅनोरॅमीक स्ट्रीट व्ह्यू या बाबींचा लाभ मिळणार नसल्याचे जिओतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

रिलायन्सच्या जिओतर्फे अलीकडेच जिओफोन-२ या मॉडेलची घोषणा करण्यात आली आहे. मात्र आधीच्या जिओफोनची कार्यक्षमता वाढविण्याचे प्रयत्नदेखील जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अलीकडचा विचार केला असता जिओफोनच्या युजर्सला गुगल असिस्टंट हा ध्वनी आज्ञावलीवर (व्हाईस कमांड) चालणारा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट वापरण्याची सुविधा देण्यात आली असून ती खूप लोकप्रिय ठरली आहे. वर नमूद केल्यानुसार काही दिवसांपूर्वीच व्हाटसअ‍ॅप, फेसबुक आणि युट्युबची सुविधा जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये आता गुगल मॅप्सचा समावेश होणार असल्यामुळे जिओफोन युजर्स नक्कीच सुखावणार आहेत.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here