गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर गुगल मॅप्सने मुंबईतील गणेश मंडळांची माहिती आपल्या नकाशावर दिली आहे.
सर्वत्र गणरायाच्या आगमनाने चैतन्याचे वातावरण निर्मित झाले असतांना गुगल मॅप्सनेही या उत्सवाला नवीन आयाम प्रदान केला आहे. याच्या अंतर्गत आता मुंबईतील काही नोंदणीकृत गणेश मंडळे तसेच शहरातील सर्व गणेश मंदिरांची माहिती गुगलच्या नकाशावर देण्यात आली आहे. यात संबंधीत मंडळावर क्लिक करताच त्या मंडळाची सर्व माहिती छायाचित्रांसह समोर येते. त्या मंडळाच्या आरती तसेच अन्य धार्मीक उपक्रमांसह दैनंदीन कार्यक्रमांची माहितीदेखील यावर देण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे गणेश मंडळांचे नाव, पत्ता, छायाचित्रे आदींसह युजर्स रिव्ह्यूजदेखील यावर असतील. तसेच मुंबईतल्या गणेश विसर्जनाची माहिती, त्याचा नियोजन, यानिमित्त करण्यात आलेला वाहतुकीतला बदल, नवीन मार्ग आदींबाबतची माहितीदेखील गुगल मॅप्सवर देण्यात आली आहे.