गुगल मॅप्सवर पत्ता शोधणे झाले सोपे

0
गुगल मॅप्स, google maps

गुगल मॅप्सने भारतीय युजर्ससाठी प्लस कोडस् ही नवीन प्रणाली सादर केली असून यामुळे देशातील कोणताही पत्ता अचूकपणे शोधता येणार आहे.

गुगल कंपनीने आधीच काही देशांमध्ये प्लस कोडस् ही प्रणाली लागू केली आहे. आता भारतीय युजर्ससाठी याला सादर करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील कार्यक्रमात गुगलतर्फे याची अधिकृत घोषणा करण्यात आली. खरं तर गुगल मॅप्सवर कोणतेही ठिकाण हे अगदी अचूकपणे शोधता येते. मात्र प्लस कोडस्मुळे याची कार्यक्षमता असून वाढणार आहे. यात संबंधीत ठिकाणाच्या पत्त्याला लोकल प्लस कोडची जोड देण्यात येणार आहे. देशातील कोणत्याही भागाचा प्लस कोड जाणून घेण्याची पध्दतदेखील सोपी आहे. यासाठी कुण्याही युजरला त्याला हव्या असणार्‍या ठिकाणाला गुगल मॅप्सवर शोधावे लागेल. या ठिकाणी पीन ठेवल्यानंतर तो त्या ठिकाणाचा प्लस कोड पाहू शकतो. हा कोड अपरिवर्तनीय आहे. म्हणजे कोणत्याही ठिकाणाचा प्लस कोड हा न बदलणारा आहे. याच्या मदतीने अगदी गुंतागुंतीचा पत्ता असणारे ठिकाणसुध्दा अतिशय सुलभपणे शोधता येणार आहे. हा कोड मोफत असून तो ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येईल. कोणत्याही ठिकाणाचा प्लस कोड हा सोशल मीडियात शेअर करता येईल. भारतीय युजर्सला प्लस कोड सादर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात अँड्रॉइड युजर्सला याचा वापर करता येईल. तर लवकरच आयओएस प्रणालीसाठी याला सादर करण्यात येणार असल्याचे गुगल कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, गुगल मॅप्सवर व्हाईस नेव्हिगेशन प्रणालीचा विस्तार करण्यात आला आहे. आधी भारतीय युजर्स फक्त इंग्रजी आणि हिंदीतच याचा वापर करू शकत होते. तथापि, आता बंगाली, गुजराती, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या सहा भारतीय भाषांमध्ये गुगल मॅप्सवरील ध्वनी आज्ञावली वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here