गुगल तेज अ‍ॅपवरून करा बिलांचा भरणा

0
google tez app, गुगल तेज अ‍ॅप

गुगल तेज अ‍ॅपवरून आता विविध बिलांचा भरणा करता येणार असून या सुविधेला कंपनीने अधिकृतपणे सादर केले आहे.

गेल्या वर्षी गुगल कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी गुगल तेज हे अ‍ॅप सादर केले होते. यात केंद्र सरकार्‍या युपीआय या प्रणालीवर आधारित डिजीटल व्यवहारांची सुविधा प्रदान करण्यात आली होती. याच्या पहिल्या टप्प्यात युजर्सला फक्त पैशांची देवाण-घेवाण करता येत होती. आता यात विविध बिलांचा भरणा करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात वीज, मोबाईल, ब्रॉडबँड, लँडलाईन आदींच्या बिलांसह डीटीएच सेवांच्या रिचार्जचा समावेश आहे. देशभरातील विविध महानगरांसह प्रमुख शहरांमधील युजर्सला ही नवीन सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात युजरला विविध खात्यांना सर्च करण्याची सुविधा देण्यात आली आहे. एकदा का कोणतेही बील भरले की यानंतर संबंधीत युजरला त्याच्या बिलांबाबत गुगल तेज अ‍ॅपवरून नोटिफिकेशन्स येतील. यानंतर तो युजर गुगल तेज अ‍ॅपच्या मदतीने विहीत वेळेवर बील भरू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here