गुगल ड्युओवर व्हिडीओ संदेशांची सुविधा

0
ड्युओ, google duo

गुगल कंपनीने आपल्य ड्युओ या अ‍ॅपच्या युजर्ससाठी व्हिडीओ मॅसेज पाठविण्याची सुविधा प्रदान करण्याची घोषणा केली आहे.

गुगल कंपनीने २०१६च्या ऑगस्ट महिन्यात लाँच केलेले ड्युओ हे व्हिडीओ कॉलींग अ‍ॅप आहे. अर्थात याच्या माध्यमातून कुणीही एकमेकांना व्हिडीओ कॉलींग करू शकतात. नंतर यावर व्हाईस कॉलींगचे फिचरदेखील देण्यात आले आहे. यात आता व्हिडीओ मॅसेजची सुविधा देण्यात आली आहे. गुगल ड्युओ अ‍ॅपच्या युजरने समजा एखाद्याला या अ‍ॅपवरून कॉल केला, मात्र समोरच्याने तो उचलला नाही. या पार्श्‍वभूमिवर, समोरच्या युजरला या फिचरच्या माध्यमातून व्हिडीओ मॅसेज पाठविता येणार आहे. यात कुणीही युजर समोरच्या व्यक्तीला ३० सेकंदापर्यंतचा व्हिडीओ पाठवू शकतो. समोरील व्यक्तीने हा संदेश पाहिल्यानंतर तो थेट हा व्हिडीओ मॅसेज पाठविणार्‍याला ड्युओ अ‍ॅपवरून कॉल करू शकतो. संबंधीत व्हिडीओ मॅसेज समोरच्या व्यक्तीने पाहिल्यानंतर एक दिवसानंतर आपोआप नष्ट होतो. अर्थात तो युजर याला आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.

गुगल ड्युओ अ‍ॅपवरील व्हिडीओ मॅसेज पाठविण्याची ही सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्ससाठी देण्यात आली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये जगभरातील युजर्सला हे फिचर मिळणार असल्याचे गुगल कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here