गुगल करणार रूग्णांच्या मृत्यूचे अचूक भाकीत

0

गुगल कंपनीने एक विशिष्ट अलॉगरिदम विकसित केला असून याच्या मदतीने असाध्य विकारांनी ग्रस्त झालेले रूग्ण नेमके केव्हा मरणार याची अगदी अचूक माहिती मिळू शकणार आहे.

जगभरात असाध्य विकारांवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. यात कर्करोगासह अन्य अनेक दुर्धर व्याधींवर उपचार सुरू असणारे रूग्ण उपचारादरम्यान, अथवा घरी नेल्यानंतर मरण पावतात. यात संबंधीत रूग्णावर किती वेळ उपचार सुरू ठेवावा? त्याच्या आयुष्याचे नेमके किती दिवस उरलेत? आदी बाबींना वैद्यकशास्त्रातील विविध चाचण्या, ठोकताळे आणि अर्थातच संबंधीत डॉक्टरचा अनुभव आदींच्या माध्यमातून जाणून घेता येते. तथापि, आता यासाठी गुगल कंपनीने पुढाकार घेत कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित एक अलगॉरिदम विकसित केला आहे. यात संबंधीत रूग्णाच्या विविध चाचण्या आणि अन्य डाटाचे अतिशय सखोल असे विश्‍लेषण करण्यात येते. यातून संबंधीत रूग्णाच्या जगण्याचे चान्सेससह तो कधी मरू शकतो याची अगदी बिनचूक माहितीदेखील मिळणार आहे. या प्रणालीच्या मदतीने काही रूग्णांबाबत अचूक भाकिते करण्यात आली असून याबाबतचा संशोधनपर प्रबंध नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे.

गुगल कंपनीने ही प्रणाली विकसित करण्यासाठी कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यात आंतरजालावर उपलब्ध असणार्‍या अजस्त्र माहितीच्या भांडाराचे स्वयंचलीत पध्दतीने विश्‍लेषण करणार आहे. याच्या अजून चाचण्या घेऊन ही प्रणाली वैद्यकशास्त्रासाठी सादर करण्यात येणार आहे. ही प्रणाली जगभरातील असंख्य रूग्णांना वरदान ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here