गुगलचे रिप्लाय अ‍ॅप दाखल

0

गुगलने काही दिवसांपासून चाचणी सुरू असणारे आपले रिप्लाय अ‍ॅप हे आता अँड्रॉइड युजरसाठी सादर करण्यात आले आहे.

गुगलने काही दिवसांपूर्वी मोजक्या युजर्सला ई-मेलच्या माध्यमातून एका अ‍ॅपची चाचणी घेण्याचे आवाहन केले होते. मात्र ही घोषणा होऊन काही दिवस उलटत नाही तोच आता हे अ‍ॅप लीक होऊन ‘एपीके मिरर’ या संकेतस्थळावर इन्स्टाॅल करण्यासाठी सादर करण्यात आले आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे ‘स्मार्ट रिप्लाय’ या प्रकारातील अ‍ॅप आहे. याचा उपयोग करून युजर एसएमएससह व्हाटसअ‍ॅप, फेसबुक मॅसेंजर, गुगल हँगआऊट, स्काईप, ट्विटर डायरेक्ट मॅसेज, व्हाटसअ‍ॅप, स्लॅक आदी विविध अ‍ॅपवरील मॅसेजला एकाच ठिकाणावरून उत्तर देऊ शकतो. गुगलच्या जीबोर्ड या अॅपच्या ६.९ या बीटा आवृत्तीतही याच प्रकारचे फिचर देण्यात आले आहे. दरम्यान, गुगल रिप्लाय अ‍ॅप हे लवकरच गुगल प्ले स्टोअरवरही दाखल होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here