क्लिअरटॅक्सातर्फे जीएसटी ऑफलाइनची सुविधा

0
क्लिअरटॅक्स, cleartaax

देशातील आघाडीचे टेक स्टार्टअप म्हणून ख्यात असणार्‍या क्लिअरटॅक्सने नवीन ऑफलाइन सॉफ्टवेअर दाखल केले असून ते व्यावसायिकांना इंटरनेटशिवाय सुलभ व सोप्या पद्धतीने जीएसटी बिले तयार करण्यामध्ये मदत करू शकते.

क्लिअरटॅक्स जीएसटी ऑफलाइन हे मोफत व वापरण्यास सुलभ असलेले बिलिंग सॉफ्टवेअर आहे. एसएमई, सीए व कर व्यावसायिकांना ऑफलाइन इनव्हॉइसेस तयार करण्यासाठी यात उत्तम सुविधा आहे. तसेच जीएसटी सॉफ्टवेअरबाबत संभ्रमावस्थेत असणार्‍या व्यावसायिकांसाठी हे सॉफ्टवेअर लाभदायी ठरणार आहे. विशेष म्हणजे यासाठी जागादेखील खूप कमी लागते. यासाठी ०.५ एमबीहून कमी मेमेरीचा वापर होतो. या संदर्भात बोलताना क्लिअरटॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले की, “आमच्याकडे ऑनलाइन कार्य करणारे क्लिअरटॅक्स जीएसटी बिलबुक नावाचे बिलिंग सॉफ्टवेअर पूर्वीपासूनच आहे. आम्ही नेहमी इंटरनेटची सुविधा प्राप्त करू न शकणार्‍या वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी हे ऑफलाइन टुल दाखल केले आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here