क्लाऊड टिव्हीची एक्स २ मालिका

0
क्लाऊड टिव्ही एक्स २,

क्लाऊड वॉकर या स्टार्टपने क्लाऊड टिव्ही एक्स २ या नावाने किफायतशीर दरातील उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणार्‍या स्मार्ट टिव्हीची मालिका बाजारपेठेत सादर केली आहे.

भारतात विविध कंपन्या स्मार्ट टिव्ही सादर करत आहेत. यात आता क्लाऊड वॉकरच्या या नवीन मॉडेल्सने सज्ज असणार्‍या मालिकेची भर पडली आहे. हा स्मार्ट टिव्ही १४,९९० रूपये मूल्यापासून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. अलीकडच्या काळात विविध देशी-विदेशी कंपन्यांनी अत्यंत वाजवी दरात नवनवीन स्मार्ट टिव्ही लाँच केलेले आहेत. याचा विचार करता या मॉडेलच्या माध्यमातून ग्राहकांना १५ हजाराच्या आत पहिल्यांदाच फोर-के रेडी फुल एचडी प्लस क्षमतेचा स्मार्ट टिव्ही आता खरेदी करता येणार आहे.

या मालिकेत ३२ ते ५५ इंच आकारमानाच्या दरम्याने विविध मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. वर नमूद केल्यानुसार हा डिस्प्ले फोर-के रेडी अर्थात एचडी प्लस इतक्या क्षमतेचा असणारा आहे. यात कोर्टेक्सचा क्वॉड-कोअर एआरएम प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके आहे. हा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे. अर्थात यात गुगल प्ले स्टोअरवरील विविध अ‍ॅप्स वापरता येणार आहेत. यासोबत सुपर रिमोट कंट्रोल असून यात इन-एयर या प्रकारातील माऊसचा समावेश करण्यात आलेला आहे. यात भारतीय कंटेंटसाठी स्वतंत्र कंटेंट डिस्कव्हरी इंजिन प्रदान करण्यात आलेले आहे. तर यामध्ये २० वॅट क्षमतेच्या स्पीकर्सचा बॉक्स देण्यात आला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथसह युएसबी, इथरनेट आदी पर्यायदेखील असतील.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Marathi Technology News, Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here