ऑनर बँड ए २ फिटनेस बँड दाखल

0

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी ऑनर बँड ए २ हा फिटनेस बँड २४९० रूपये मूल्यात उपलब्ध केला आहे.

ऑनर बँड ए २ हा फिटनेस बँड ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून ८ जानेवारीपासून खरेदी करता येणार आहे. यातील विशेष फिचर म्हणजे हार्ट रेट मॉनीटर होय. याच्या मदतीने हृदयाच्या ठोक्यांचे अचूक मापन करता येते. ही प्रणाली इंटिलेजियंट अल्गॉरिदमचा वापर करत असून यामुळे अगदी रिअल टाईम या पध्दतीत हृदयाच्या ठोक्यांचे मापन केले जाते. यात अतिशय कमी उर्जा वापरणारी चीप दिलेली असल्यामुळे बॅटरीचा कमी वापर होतो. यात निद्रेचे मापन करणारी प्रणालीदेखील दिलेली आहे. यामुळे निद्रेविषयक विकारांवर नजर ठेवता येते. यात ०.९६ इंच आकारमानाचा मल्टीटच या प्रकारातील ओएलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. तसेच यात मल्टीपल वर्कआऊट मोड, स्मार्ट अलार्म्स, स्लीप मॉनिटरींग, मॅसेज डिस्प्ले आदी फिचर्स दिलेले आहेत. हा फिटनेस बँड स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो. यावरून कॉल करणे अथवा रिसीव्ह करणे आदी बाबी शक्य आहेत. तसेच यावर विविध नोटिफिटकेन्शही पाहता येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here