ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीसाठी गुगलचे नवे पाऊल

0

गुगलने आपल्या अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्सला ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीची अनुभूती प्रदान करण्यासाठी ‘एआर कोअर’ या नावाने अतिशय उपयुक्त असे टुल प्रदान केले आहे.

ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजेच विस्तारीत सत्यता हे अतिशय चित्तथरारक असे क्षेत्र आहे. याचा अतिशय उत्तम असा वापर ‘पोकेमॉन गो’ या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गेमच्या माध्यमातून जगासमोर आला आहे. यात वास्तवाला कल्पनेचे पंख लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून जगातील आघाडीच्या टेक कंपन्या ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीत नवनवीन संशोधन करतांना दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर आता गुगलने एआर कोअर’ जाहीर केले आहे. हे एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट म्हणजेच ‘एसडीके’ आहे. याच्या मदतीने स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आपापल्या अँड्रॉइड प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोन्सच्या ग्राहकांसाठी ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीवर आधारित विविध सुविधा सादर करू शकतात. यासाठी गुगलने सॅमसंग, हुआवे, एलजी, आसुस आदी कंपन्यांशी करार केला आहे. येत्या काही दिवसांत अँड्रॉइड युजर्सला ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीला सपोर्ट करणारे वेब ब्राऊजर्स तसेच विविध अ‍ॅप्लीकेशन्स सादर करण्यात येतील असे संकेत यातून मिळाले आहेत. गुगलने आधीच ‘प्रोजेक्ट टँगो’च्या माध्यमातून ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीची पहिली झलक प्रदान केली आहे आता ‘एआर कोअर’च्या माध्यमातून याला नवीन आयाम प्रदान करण्यात येईल. या माध्यमातून गुगलने अ‍ॅपलच्या ‘एआर किट’ला प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे.

‘एआर कोअर’ या प्रणालीत प्रामुख्याने तीन मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यातल्या मोशन ट्रॅकींगच्या अंतर्गत स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याच्या मदतीने भोवतालच्या परिसराती लांबी-रूंदी याचे अचूक मापन करण्यात येते. तसेच यात आभासी वस्तूंना योग्य त्या ठिकाणी ठेवण्याची सुविधादेखील यातून मिळणार आहे. ‘एनव्हायर्नमेंट अंडरस्टँडींग’च्या माध्यमातून समांतर पातळीवर आभासी वस्तू योग्य पध्दतीने ठेवता येतील. तर ‘लाईट एस्टीमेशन’च्या मदतीने आभासी वस्तू ठेवत असतांना भोवतालच्या प्रकाशाला सुसंगत अशी प्रकाश व्यवस्था करणे सोपे जाणार आहे.

पहा: गुगलच्या ‘एआर कोअर’ची प्राथमिक माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here