एसर निट्रो ५ स्पीन: जाणून घ्या सर्व फिचर्स

0

एसर कंपनीने निट्रो ५ हा कन्व्हर्टीबल गेमिंग लॅपटॉप लाँच केला असून हे मॉडेल लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे.

एसर निट्रो ५ स्पीन कन्व्हर्टीबल गेमिंग लॅपटॉप या मॉडेलमध्ये आठव्या पिढीतला इंटेलचा कोअर आय-७ व कोअर आय-५ प्रोसेसरचे पर्याय असतील. याला एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० या ग्राफीक कार्ड आहे. यात एसरच्या ट्रु-हार्मनी आणि स्मार्ट अँम्पलीफायरसह डॉल्बी ऑडिओ प्रिमीयम या प्रणालींसह दोन स्पीकर आणि एक सब-वुफर देण्यात आले आहे.

एसर निट्रो ५ स्पीन हा लॅपटॉप १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्लेने सज्ज आहे. याची रॅम ८ जीबी तर २५६ जीबी इतके एसएसडी तर १ टेराबाईटची हार्ड डिस्कच्या स्वरूपात स्टोअरेज असेल. यात ब्लॅकलिट या प्रकारातील कि-बोर्डसह वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ, युएसबी, युएसबी ३.०, युएसबी टाईप-सी, एचडीएमआय, टु-इन-वन कार्ड रीडर आदी फिचर्स असतील. यात ३२२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे १० तासांचा बॅकअप देत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तर हा लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असेल. याच्या कोअर आय-५ प्रोसेसरयुक्त मॉडेलचे मूल्य ७९,९९० तर आय-७ प्रोसेसरयुक्त मॉडेलचे मूल्य ९४,९९० रूपये असून ते ग्राहकांना फ्लिपकार्टसह कंपनीच्या देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here