एसर निट्रो ५ लॅपटॉप भारतात दाखल

0
एसर निट्रो ५ लॅपटॉप , acer nitro 5 gaming laptop

एसर कंपनीने खास गेमर्ससाठी विकसित केलेल्या लॅपटॉपची मालिका भारतीय बाजारपेठेत उताण्याची घोषणा केली आहे.

एसर निट्रो ५ गेमिंग लॅपटॉप हे या वर्षाच्या प्रारंभी लाँच करण्यात आले होते. आता ही मालीका भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही मालीका खास गेमर्ससाठी विकसित करण्यात आलेली आहे. लॅपटॉपवर गेमिंगचा आनंद घेण्यासाठी यात नियमीत मॉडेलपेक्षा काही अतिरिक्त फिचर्सचा समावेश असावा लागतो. यात प्रामुख्याने अतिशय गतीमान असा प्रोसेसर, उच्च पिक्सल्सयुक्त डिस्प्ले, दर्जेदार शीतकरण प्रणाली आदींचा समावेश होत असतो. या बाबींचा विचार करता, निट्रो ५ मालिकेत अतिशय उत्तमोत्तम फिचर्सचा अंतर्भाव करण्यात आला आहे. प्रोसेसरचा विचार केला असता या मालिकेतील विविध मॉडेल्समध्ये आठव्या पिढीतील इंटेल कोअर आय ७ प्रोसेसर आणि एएमडी आणि एएमडी रायझेन ५ या प्रोसेसरचे पर्याय देण्यात आलेले आहेत. गेमिंगसाठी अतिशय उच्च दर्जाच्या ग्राफिक्सची आवश्यकता असते. या अनुषंगाने यात एनव्हिडीयाच्या १०५० अथवा १०५० टीआय या ग्राफीक्स प्रोसेसरची जोड या लॅपटॉप्सला देण्यात आली आहे. यामध्ये इंटेलच्या ऑप्टेन मेमॉयर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे लॅपटॉपच्या डिस्प्लेवर गेमर आपले कंटेंट तातडीने डिस्प्ले करू शकतो. यामध्ये ३२ जीबीपर्यंतची रॅम आणि ५१२ जीबी पर्यंतच्या इनबिल्ट स्टोअरेजचे पर्याय प्रदान करण्यात आले आहेत.

एसर निट्रो ५ लॅपटॉपच्या मालिकेमध्ये १५.६ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेच्या डिस्प्लेला प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये अतिशय दर्जेदार असा ब्लॅकलीट या प्रकारातील कि-बोर्ड देण्यात आला आहे. यामध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी ३.१, युएसबी टाईप-सी, युएसबी २.०, एचडीएमआय, एसडी कार्ड रीडर आदी फिचर्सचादेखील समावेश करण्यात आला आहे. एएमडी रायझेन ५ प्रोसेसरयुक्त निट्रो५ लॅपटॉप्स हे ६५,९९९ तर इंटेल प्रोसेसरयुक्त ७२,९९९ रूपयांपासून बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहेत.

टेकवार्ताविषयी

टेकवार्ता : आपल्या माय मराठी भाषेत तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्व घडामोडी येथे आपल्याला मिळतील. यात मराठी टेक न्यूज, गॅजेट न्यूज, सोशल मीडिया, स्मार्टफोन न्यूज, रिव्ह्यूज, व्हायरल न्यूज, ट्रेंड, टेक टिप्स, अ‍ॅप्स, गेम्स, मराठी टेक, मराठी टेक न्यूज आदींचा समावेश आहे.

Techvarta : Only tech news portal in marathi language. Technews in marathi, gadgets news in marathi, smartphone news in marathi, social media news in marathi, viral news in marathi, trending news in marathi, reviews in marathi apps news in marathi, marathi tech news, marathi tech.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here