एसरचा नवीन गेमिंग लॅपटॉप

0

एयर कंपनीने न्युट्रो हा गेमिंग लॅपटॉप भारतीय ग्राहकांना सादर केला असून हे मॉडेल फ्लिपकार्टसह एसर स्टोअर्समधून उपलब्ध करण्यात आले आहे.

एसर न्युट्रो गेमिंग लॅपटॉप या मॉडेलमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल हाय डेफिनेशन अर्थात १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात चार जीबी रॅम युक्त एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५०/१०५०टीआय हे ग्राफीक कार्ड संलग्न करण्यात आले आहे. एसर न्युट्रो गेमिंग लॅपटॉप या मॉडेलमध्ये डॉल्बीची ऑडिओ प्रिमीयम तर एसरच्या ट्रु हार्मनी या दोन प्रणालींनी युक्त असणारी ध्वनी प्रणाली देण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये इंटेलचा सातव्या पिढीतला कोअर आय-७ हा प्रोसेसर असेल. याची रॅम १६ जीबी तर स्टोअरेजसाठी एक टेराबाईटपर्यंतचे पर्याय देण्यात आले आहेत. एसर न्युट्रो गेमिंग लॅपटॉप हे मॉडेल फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलसह देशभरातील एसर स्टोअर्समधून भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले असून याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ७५९९० रूपयांपासून सुरू होणारे आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फायच्या सुविधेसह एक युएसबी ३.१ टाईप-सी पोर्ट, एक युएसबी ३.० पोर्ट, दोन युएसबी २.० पोर्ट तर एक एचडीएमआय २.० पोर्ट देण्यात आले आहेत. तर हा लॅपटॉप विंडोज १० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here