एलजीचे फोर-के युएचडी प्रोजेक्टर

0

एलजी कंपनीने फोर-के युएचडी क्षमतेच्या प्रक्षेपणास सक्षम असणारे एचयू८०केए हे प्रोजेक्टर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

बाजारपेठेत आता फोर-के युएचडी क्षमतेचे प्रोजेक्टर हळूहळू लोकप्रिय होऊ लागले आहेत. काही कंपन्यांनी या प्रकारातील प्रोजेक्टर सादर केले असून यात आता एलजी एचयू८०केए या मॉडेलची भर पडली आहे. याची खासियत म्हणजे अन्य फोर-के प्रोजेक्टर मॉडेलपेक्षा याचा आकार जवळपास निम्मा आहे. अर्थात हे प्रोजेक्टर अतिशय आटोपशीर आकाराचे आहे. याची प्रकाश क्षमता २,५०० ल्युमेन्स इतकी असून याच्या मदतीने तब्बल १५० इंच आकारमानाच्या पडद्यावर चलचित्राचे प्रक्षेपण करता येते. यात एचडीआर १० या मानकाचा सपोर्ट दिलेला आहे.

एलजी कंपनीचे हे प्रोजेक्टर ७ वॅट क्षमतेच्या दोन स्पीकर्सने सज्ज आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीचा आनंद घेता येतो. यात वेबओएस ३.५चा इंटरफेसदेखील देण्यात आला आहे. याचा उपयोग करून युजर टिव्हीवरील विविध कार्यक्रमांना पाहू शकतो. हे प्रोजेक्टर युएसबी, एचडीएमआय आणि इथरनेट या कनेक्टीव्हिटीच्या पर्यायांनी सज्ज आहे. हे प्रोजेक्टर नेमके केव्हा उपलब्ध होणार आणि याचे मूल्य काय असेल याबाबत सीईएस-२०१८मध्ये माहिती देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here