एलजीचे ड्युअल इन्व्हर्टरयुक्त एयर कंडिशनर

0

एलजी कंपनीने ड्युअल इन्व्हर्टर या तंत्रज्ञानाने सज्ज असणारे एयर कंडिशनर भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

एलजी कंपनीचे हे नवीन एयर कंडिशनर मॉडेल हे विंडो एसी या प्रकारातील असून याचे मूल्य ४३,९९० रूपये इतके असेल. कोणत्याही एयर कंडिशनरमध्ये काँप्रेसर हा सर्वात महत्वाचा घटक असतो. या पार्श्‍वभूमिवर, एलजीच्या या मॉडेलमध्ये तब्बल १० वर्षांची वॉरंटी असणारा काँप्रेसर देण्यात आला आहे. याच्या मदतीने तब्बल ५२ अंशापर्यंतच्या तापमानाचे नियंत्रण शक्य असल्याचा कंपनीचा दावा आहे. याला ब्युरो ऑफ इंडियन इफिशियन्सी या संस्थेने पंचतारांकीत मानांकन दिले आहे. यामुळे हे एयर कंडिशनर कमी उर्जेत काम करत असल्याचे स्पष्ट आहे. यात ड्युअल रोटरी काँप्रेसर दिलेे आहे. यामुळे शीतकरणाची प्रक्रिया जलद गतीने होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. येऊ घातलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमिवर, हे एयर कंडिशनर मॉडेल बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here