एलजीचा फोर-जी टॅबलेट

0

एलजी कंपनीने वजनाने अतिशय हलका असणारा व फोर-जी कॉलिंगची सुविधा असणारा जीपॅड ४ ८.० एफएचडी एलटीई हा टॅबलेट ग्राहकांना सादर केला आहे.

एलजी जीपॅड ४ ८.० एफएचडी एलटीई हे मॉडेल अवघे १९० ग्रॅम वजनाचे अर्थातच सोड्याच्या एखाद्या कॅनपेक्षाही हलके आहे. अर्थात याची विक्री करतांना कंपनीने या बाबीवर लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच नावात नमूद असल्यानुसार यात फोर-जी नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. उर्वरित फिचर्सचा विचार करता, यात आठ इंची आकारमानाचा आणि १९२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच फुल हाय डेफिनेशनचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टिबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे पाच मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. तर अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे हे मॉडेल ३,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज आहे. एलजी कंपनीने पहिल्यांदा हा टॅबलेट दक्षिण कोरियन बाजारपेठेत सादर केले असून याचे भारतीय चलनानुसारचे मूल्य २० हजार रूपयांच्या आसपास आहे. तर याच्यासोबत सुमारे पाच हजार रूपयांचा प्लस पॅकही उपलब्ध करण्यात आला असून यात टॅबलेट केस, युएसबी पोर्ट, एक्सटर्नल बॅटरी पॅक आदींचा समावेश असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here