एलजीचा तब्ब्ल पाच कॅमेऱ्यांनी सज्ज स्मार्टफोन !

0
एलजी व्ही४० थिनक्यू, lg v40 thinq

एलजी कंपनीने आज एलजी व्ही४० थिनक्यू हा नवीन स्मार्टफोन जाहीर केला असून यामध्ये तब्ब्ल पाच कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून एलजी कंपनीच्या व्ही ४० थीनक्यू या मॉडेलबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या अनुषंगाने आज या मॉडेलला अधिकृतपणे बाजारपेठेत उतारण्याची घोषणा करण्यात आली. हे मॉडेल या कंपनीच्या आधीच्या एलजी व्ही३०ची पुढील आवृत्ती असणार असून यामध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. अर्थात यात सर्वात लक्षणीय बदल हे कॅमेर्‍यांमध्ये असणार आहे. कॅमेरा हा कोणत्याही स्मार्टफोनमधील सर्वात महत्वाचा घटक असल्याची बाब कुणाला नाकारता येणार नाही. यामुळे प्रत्येक कंपनी आपल्या मॉडेलमध्ये उत्तम दर्जाचा कॅमेरा असावा याकडे लक्ष देत असते. खरं तर, याची मोठी स्पर्धाच सुरू असल्याचेही आता दिसून येत आहे. अलीकडे ड्युअल कॅमेरा सेटअप लोकप्रिय झालेला आहे. याचा वापर करून अगदी सजीव वाटणार्‍या प्रतिमा घेता असल्यामुळे आता किफायतशीर मूल्य असणार्‍या स्मार्टफोनमध्येही ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जात आहे. तर काही कंपन्या सेल्फीसाठीही याच प्रकारचा सेटअप देत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, एलजी कंपनीने आपल्या व्ही४० थिनक्यू या मॉडेलमध्ये एकंदरीत पाच कॅमेरे दिले आहेत.

एलजी व्ही४० थिनक्यू या मॉडेलच्या मागील बाजूस १२, १२ आणि १६ मेगापिक्सल्स क्षमतांच्या तीन कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील एक स्टॅंडर्ड, दुसरा सुपर वाईड अँगल लेन्सयुक्त तर तिसरा सुपर टेलिफोटो लेन्स या प्रकारातील असणार आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांमधून एकत्रीतपणे प्रतिमा अथवा चलचित्र घेता येणार आहेत. या इमेजेस व व्हिडीओ हे अधिक सजीव भासणारे असून यातील रंगसंगती ही अतिशय दर्जेदार असेल. यात दर्जेदार झूमची सुविधासुध्दा आहे. तर याच्या पुढील बाजूस ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप दिला आहे. अर्थात यातून घेण्यात येणारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगदेखील अतिशय उत्तम दर्जाचे असतील.

एलजी व्ही ४० थिनक्यू या मॉडेलमध्ये ६. इंच आकाराचा व क्यूएचडी प्लस क्षमतेचा फुलव्हिजन या प्रकारातील डिस्प्ले दिला आहे. याची रॅम ६ जीबी असून स्टोरेज साठी ६४ व १२८ जीबी असे दोन पर्याय आहेत. हा फोन वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ असून याचा लूक अतिशय आकर्षक आहे. यातील बॅटरी ३३९० मिलीअँपियरची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारे आहे. आज हा स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. ग्लोबल लाँचींगनंतर हे मॉडेल लागलीच भारतात उपलब्ध होण्याचीही शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here