एयरटेल आणि जिओवर फुटबॉल विश्‍वचषकाचे लाईव्ह स्ट्रीमिंग

0

आजपासून सुरू होणार्‍या फुटबॉल विश्‍वचषकाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची घोषणा एयरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी केली आहे.

फिफा फुटबॉलचा विश्‍वचषक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा सोहळा मानला जातो. या अनुषंगाने आजपासून सुरू होणार्‍या विश्‍वचषकाचे औचित्य साधून विविध कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अनुषंगाने एयरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी फुटबॉल विश्‍वचषकातील सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यासाठी इंग्रजीच नव्हे तर हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमधील समालोचनाचा पर्यायदेखील देण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण एयरटेल टिव्ही अ‍ॅपच्या माध्यमातून होणार आहे. या अ‍ॅपवर विविध सामन्यांच्या वेळापत्रकासह सर्व अद्ययावत माहितीदेखील देण्यात येणार आहे. अर्थात यासाठी एयरटेल टिव्हीच्या अ‍ॅपची अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी असणारी ताजी आवृत्ती इन्स्टॉल करावी लागणार आहे.

दरम्यान, रिलायन्स जिओनेही आपल्या जिओ टिव्ही अ‍ॅपवरून लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचे जाहीर केले आहे. यातही सामन्यांना भारतीय भाषांमधील समालोचनासह पाहता येणार आहे. यासाठी एयरटेल कंपनीप्रमाणेच जिओनेही आपल्या ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारची अतिरिक्त आकारणी न करण्याचे जाहीर केले आहे. तसेच जिओ अ‍ॅपवर भारत व अफगाणिस्थानमधील कसोटी क्रिकेट सामन्याचेही लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here