एयरटेलच्या ग्राहकांना हॉटस्टारचा मोफत लाभ

0
Airtel

एयरटेलच्या ग्राहकांना आता हॉटस्टार हा स्ट्रीमिंग सेवेचा मोफत लाभ घेता येणार असून याबाबत एयरटेलतर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

रिलायन्स जिओच्या धडाक्याला आव्हान देण्यासाठी एयरटेलने आधीच मर्यादीत काळासाठी आपल्या ग्राहकांना अमेझॉन प्राईम व्हिडीओची सेवा देण्याची घोषणा केली होती. यानंतर आता या कंपनीने हॉटस्टार या स्ट्रीमिंग सेवेचा मोफत लाभ आपल्या ग्राहकांना देण्याचे जाहीर केले आहे. याचा ग्राहकांना जून २०१८पर्यंत मोफत वापर करता येणार आहे. भारतीय बाजारपेठेत स्ट्रीमिंग सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस सुरू झाली आहे. यात हॉटस्टारने अन्य स्पर्धकांना मोठे आव्हान उभे केले आहे. हॉटस्टारकडे सध्या ९ भारतीय भाषांमधील सुमारे १ लाख तासांपेक्षा जास्त कंटेंट उपलब्ध आहे. यात चित्रपट, डॉक्युमेंटरीज, दूरचित्रवाणी कार्यक्रम आदींसह अन्य कार्यक्रमांचा समावेश आहे. याला एयरटेलचे ग्राहक मोफत पाहू शकतील. ही सेवा एयरटेल टिव्ही अ‍ॅपच्या माध्यमातून वापरता येणार आहे. एयरटेलच्या प्रिपेड आणि पोस्टपेड या दोन्ही प्रकारातील ग्राहकांसाठी याला लागू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here